चीनी सैन्याची माघार; पण, 'या' महत्वाच्या ठिकाणावर तणाव तेवढाच, हाच आहे वादाचा 'खरा' मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:49 PM2020-06-09T20:49:14+5:302020-06-09T20:55:44+5:30
कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात...
नवी दिल्ली : पूर्वेकडील लडाखमध्ये लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LAC)वरील तणाव संपण्याच्या मार्गाने भारत आणि चीनने दोघांनीही पावले टाकली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून चीनी सैन्य मागे हटले आहे. आणि त्यांनी त्यांचे टेंटदेखील कमी केले आहेत. मात्र, फिंगर-4ची समस्या अद्यापही जैसेथेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेगाँग त्सोजवळ फिंगर-4वरील तणाव कमी करण्यात वेळ लागू शकतो. कारण, चीनी सैन्य येथून मागे हटण्यास अद्याप तयार नाही. त्यामुळे तेथील तणाव अद्याप संपलेला नाही.
केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं
कोर कमांडर स्तरावर झालेल्या 6 जूनच्या बैठकीत दोन्ही कडच्या सैनिकांनी मागे हटावे, असे ठरले होते. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, या बैठकीत तणावाच्या चार ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. यात, पेंगाँग त्सो भागातील फिंगर-4, गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉइंट-14, पेट्रोलिंग पॉइंट-15 आणि हॉट स्प्रिंग एरिआ, यांचा समावेश होता. या बैठकीत निश्चित करण्यात आले होते, की तणावाशिवाय, इतर मुद्यांसंदर्भात लोकल कमांडर स्तरावर चर्चा केली जाईल. तेव्हा आशा व्यक्त करण्यात आली होती, की डेलिगेशन आणि हायएस्ट कमांडर लेव्हलवर चर्चेतून समस्या सुटू शकते. मात्र, फिंगर-4संदर्भात पूर्वीप्रमाणेच तणाव कायम आहे.
जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'
चीनने बंद केला एरिआ -
एलएसी तणावाचा सर्वात मोठा मुद्दा फिंगर-4 हाच आहे. येथे मोठ्या संख्येने चीनी सैनिक तैनात आहेत. यापूर्वी भारतीय सैनिक फिंगर-8पर्यंत पेट्रोलिंगसाठी जात होते. मात्र, चीनी सैनिकांनी फिंगर-4जवळच रस्ता बंद केला आहे. भारताचा दावा आहे, की एलएसी फिंगर-8जवळून जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकानांवरून मागे हटण्याचे चीनचे पाऊल चर्चेचे वातावरण सकारात्मक राहावे यासाठी आहे. पण खरा तणाव तर फिंगर-4 वरच आहे.
बुधवारी हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक -
6 जूनला झालेल्या बैठकीच्या आधारावर बुधवारी पुन्हा हायएस्ट कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. यानंतर 8-10 दिवसांतच वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक कमांडर स्तरापासून ते डेलिगेशन स्तरापर्यंत बैठका होतील. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिंगर-4वरील तोडगा एवढ्या लवकर निघण्याची शक्यता नाही. यासाठी पुन्हा एकदा कोर कमांडर स्तरावरील बैठक बोलावली जाऊ शकते.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...