मुख्य अंक सिंगल
By admin | Published: December 8, 2015 01:51 AM2015-12-08T01:51:41+5:302015-12-08T01:51:41+5:30
दुभाजकांमधील झाडांची निगा राखावी
Next
द भाजकांमधील झाडांची निगा राखावीसोलापूर: सोलापूर शहर दिवसेंदिवस विकसित होऊन स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. त्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुभाजक करण्यात आले आहेत. त्यामध्ये व रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर महापालिका, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात यावा. वृक्षारोपण केलेल्या झाडांची योग्य निगा राखली जावी. मोकाट जनावरांपासून त्याचे संरक्षण करण्यात यावे. हरित सोलापूर, स्मार्ट सोलापूर हा उपक्रम हाती घ्यावा. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र चौधरी-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवाहनसोलापूर: जिल्?ातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्तीसाठी सन 2015-16 मध्ये ऑनलाईनवर ई-स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची मुदत शासनाने 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. महाविद्यालयातील प्राचार्य, संबंधित लिपिकांनी संबंधित फॉर्म बिनचूक भरण्यासाठी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर माहिती लावावी. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज काळजीपूर्वक भरुन संबंधित महाविद्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण सोलापूर कार्यालयाचे सहायक आयुक्त नागेश चौगुले यांनी केले आहे. जवंजाळ यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवडसोलापूर: हिप्परगा येथील हर्षवर्धन हायस्कूलचे शिक्षक संजय रामचंद्र जवंजाळ यांनी ‘धरु पर्यावरणाची कास, साधू सर्वांगीण विकास’ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने या नवोपक्रमाची निवड केली. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तु. ना. लोंढे, सचिव वि. रा. गरड, शं. गो. गंभीरे, उ. शं. ढेकळे यांनी कौतुक केले. सलीमबेग मोगल यांचा सत्कारसोलापूर: डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सलीमबेग मोगल यांचा हुतात्मा तरुण मंडळ व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राम जाधव, गणेश अकलूजकर, कृष्णात जाधव, ललित धावणे, योगेश जगदाळे, सागर धावणे, अजिंक्य शितोळे, ओंकार धावणे, आकाश शिंदे, सागर गायकवाड, विजय गुंडे, शैलेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.