ऐक्य जपण्यास ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’
By Admin | Published: November 30, 2015 03:18 AM2015-11-30T03:18:07+5:302015-11-30T03:18:07+5:30
वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात
नवी दिल्ली : वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात, त्यांनी देशाचे ऐक्य आणि सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी सूचना मागवल्या आहेत. ‘अंतर्गत दक्षता हेच स्वातंत्र्याचे बक्षीस आहे. देशाच्या ऐक्याची संस्कृती कायम राहायला हवी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती कार्यक्रमात मी याविषयी बोललो होतो. या संकल्पनेला योजनेचा आकार दिला जावा, असे मला वाटते. या योजनेची रचना कशी असावी, लोगो आणि जनसहभाग कसा वाढवावा, यावर ट८ॠङ्म५.ूङ्मे या पोर्टलवर सूचना- शिफारशी सादर कराव्या. तुमची सर्जनशीलता कामी आणून ऐक्य आणि सलोख्याचा मंत्र देत, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही योजना साकारू या,’ असे आवाहन मोदींनी केले. ही योजना कशी असावी, त्यात कोणते कार्यक्रम समाविष्ट असावेत, सरकार, समाज आणि नागरी समुदायाने काय करावे, यावर ‘ही प्रतिष्ठित अशी तहहयात चालणारी योजना असावी. त्यात प्रत्येक जण सहजरीत्या जोडला जावा,’ असे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करीत, सरकार काहीही करीत नसल्याचे आरोप होत असताना, मोदींनी केलेल्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘अवयवदानामुळे कुणाला नवे आयुष्य लाभू शकते. एखाद्याचे मौल्यवान आयुष्य वाचविता येते. ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अशक्तता दिवस’ म्हणून पाळला जातो.
संयुक्त राष्ट्राकडे अवयवदान करू इच्छिणाऱ्यांच्या फोनकॉल्सची संख्या सात पटीने वाढली आहे. अवयवदानामुळे एखाद्याला नवे जीवन लाभत असल्यामुळे, सर्वोत्तम दान दुसरे कोणते असू शकणार?’ असे मोदी म्हणाले.
२७ नोव्हेंबर रोजी भारतात अवयवदान दिवस पाळण्यात आला. या क्षेत्रात आणखी जागरूकता वाढेल, असा मला विश्वास आहे. काश्मीरच्या जावेद अहमद यांना अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, पण ते वाचले.
दहशतवादाची जखम त्यांची उमेद घालवू शकली नाही. त्यांनी जीवन समाजसेवेला समर्पित केले. शरीर साथ देत नसतानाही, ते गेल्या २० वर्षांपासून मुलांना शिकविण्याच्या कामात मग्न झाले आहेत,’ असा उल्लेखही त्यांनी केला.