चर्चिल यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला
By admin | Published: September 10, 2015 02:32 AM2015-09-10T02:32:11+5:302015-09-10T02:32:11+5:30
लुईस बर्जर प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. इतर कारणांबरोबरच चर्चिल
पणजी : लुईस बर्जर प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. इतर कारणांबरोबरच चर्चिल यांचे स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. लुईस बर्जर लाच प्रकरणात मुख्य आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्यालाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी चर्चिल यांच्या याचिकेत आहे. दस्तऐवज हेच पुरावे गृहीत धरून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आपण दस्तऐवजांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आणखी कोठडीत ठेवण्याचे कोणतेच कारण नाही, असा दावा चर्चिल यांच्यातर्फे वकील अशोक मुंदरगी यांनी केला.