गिरणा नदीवरील बंधारा कायम ठेवावा निवेदन : उत्राण गु.ह.येथील नागरिकांचे जिल्हा प्रशासनाला साकडे
By admin | Published: December 16, 2015 11:50 PM2015-12-16T23:50:41+5:302015-12-16T23:50:41+5:30
जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.
Next
ज गाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गु.ह.येथील पाणी टंचाईचे निवारण व्हावे यासाठी ग्रामस्थांतर्फे बांधण्यात आलेला गिरणा नदी पात्रातील बंधारा कायम ठेवण्यात यावा या आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांना दिले आहे.उत्राण परिसरातील पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता ग्रामस्थांकडून स्वखर्चाने गिरणा नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधार्यातून खालच्या गावांना पाणी जाण्यासाठी मोठा विसर्ग आहे. या बंधार्यात जास्तीत जास्त एक ते दोन दिवस पाणी साठा राहत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होत असते. जिल्हाधिकार्यांनी गिरणा नदीवरील बंधारे तोडण्याचे आदेश दिल्यानंतर या बंधार्याच्या बाजूने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या बंधार्याच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून तसेच शिक्षण व व्यापारानिमित्त अन्य ठिकाणी स्थाईक झालेल्या ग्रामस्थांकडून लोकवर्गणी करीत १६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला आहे. यावर्षी पाणी टंचाईची स्थिती असल्याने जिल्हाधिकार्यांनी बंधारे तोडण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने हा बंधारा तोडल्यास लाखो रुपयांचे नुकसान होऊन आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विचार करून उत्राण गु.ह.तील हा बंधारा कायम ठेवावा अशी मागणी सरपंच अनिल महाजन, डॉ.मगन महाजन, डॉ.भास्कर पाटील, मधुकर महाजन, सुरेश महाजन, संतोष मोरे, खंडू कोळी, सुभाष कोळी, प्रदीप भालेराव यांनी केली आहे.कोटजिल्हा प्रशासनाने बंधारे तोडण्यासाठी अडथळा आणणार्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल मात्र बंधारा तोडू देणार नाही. बंधारा तोडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने आमचे प्राण घ्यावे, त्यानंतर बंधारा तोडावा.अनिल महाजन, सरपंच, उत्राण गु.ह.