त्रिपुरातील रथ यात्रेत मोठी दुर्घटना, ६ जणांचा मृत्यू, १५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:12 PM2023-06-28T21:12:03+5:302023-06-28T21:13:19+5:30
उनाकोटी जिल्ह्याच्या कुमारघाटमध्ये ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती
त्रिपुरातील जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटन घडली असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील कुमारघाटमधून भगवान जगन्नाथ यांची यात्रा काढण्यात येत होती. या रथयात्रेत वीजेचा मोठा प्रवाह वाहणाऱ्या तारेला रथाचा स्पर्श होऊन दुर्घटना घडली. रथाचा वीजेच्या तारेला स्पर्श होताच प्रवाह वाहू लागल्याने करंट बसून ६ जणांचा मृत्यू झाला. तर, या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रथयात्रेत गोंधळ निर्माण झाला असून जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उनाकोटी जिल्ह्याच्या कुमारघाटमध्ये ही ह्रदय पिळवून टाकणारी घटना घडली. येथे भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा काढण्यात आली होती, या रथयात्रेत ४ वाजण्याच्या सुमारास हा विद्युत प्रवाहाची दुर्घटना घडली. लोखंडाच्या या रथाला शेकडो लोक आपल्य हातांनी ओढथ नगर प्रदक्षिणा करवत होते. त्याचवेळी, रस्त्यातील एका हायव्होल्टेज तारेला ह्या रथाचा स्पर्श झाला. त्यामुळे, रथात वेगाचा करंट पसरला आणि २० ते २५ जण या प्रवाहात सापडले. त्यात, ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत.
VIDEO | Six dead, 15 injured as chariot comes in contact with high tension wires during Rath Yatra in Tripura. pic.twitter.com/1fOYYL2yO1
— Press Trust of India (@PTI_News) June 28, 2023
दरम्यान, ही घटना इतकी भयंकर होती की, विजेच्या प्रवाहामुळे रथात बसलेल्या व्यक्तींना आग लागली होती. लोक ओरडत होते, पण प्रवाहामुळे त्यांच्यासमोरच काहीजण जळून मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. मात्र, दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. हा रथ १३३ केव्ही ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.