अमेरिकेतून भारतीय घुसखोरांच्या हकालपट्टीनंतर ट्रॅव्हल एजंट्सवर मोठी कारवाई, १७ जणांवर गुन्हे, ३ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 23:22 IST2025-02-24T23:22:04+5:302025-02-24T23:22:36+5:30
Punjab News: डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेत आतापर्यंत चार विमानातून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या शेकडो भारतीयांना मायदेशात परत धाडण्यात आले आहे.

अमेरिकेतून भारतीय घुसखोरांच्या हकालपट्टीनंतर ट्रॅव्हल एजंट्सवर मोठी कारवाई, १७ जणांवर गुन्हे, ३ अटकेत
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. तसेत आतापर्यंत चार विमानातून अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या शेकडो भारतीयांना मायदेशात परत धाडण्यात आले आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या या कारवाईनंतर भारतातून लोकांना बेकायदेशीररीत्या अमेरिकेत पाठवणाऱ्या ट्रॅव्हल एजंट्सवरही कारवाईला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये विना परवाना ट्रॅव्हल एजंट म्हणून कामकरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत १७ ट्रॅव्हल एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण पंजाबमध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात छापेमारी करत आहेत. आज डंकी रूटच्या माध्यमातून लोकांना अमेरिकेत पाठवणाऱ्या एजंटांची ओळख पटवण्यासाठी अमृतसर आणि जालंधरसह अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तसेच जालंधरच्या उपायुक्तांनी परवाना नुतनीकरण न करणाऱ्या २७१ ट्रॅव्हल एजंटना नोटिस बजावली आहे. तसेच ट्रॅव्हल एजंट, इमिग्रेशन कंसल्टन्टच्या कार्यालयांमधील कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हा पोलिसांना ट्रॅव्हल एजंटविरोधात कुठलीही तक्रार मिळाल्यास त्वरित उपायुक्तांच्या कार्यालयाला सूचना देण्यास सांगण्यात आले आहे.
त्यांनी सांगितले की, आपापल्या कार्यालयात योग्य नोंदी ठेवण्याचे आणि अपूर्ण कागदपत्रांसह काम न करण्याच्या सूचना ट्रॅव्हल एजंटना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत ट्रॅव्हल एजंटवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.