पंजाब पोलिसांनी मोठा कट उधळला; चार दहशदवाद्यांच्या आवळल्या मुसक्या, दारुगोळा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 03:51 PM2022-08-14T15:51:51+5:302022-08-14T16:15:50+5:30
स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाक-आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
मोहाली: स्वातंत्र्य दिनापूर्वी पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने पाक-आयएसआय समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पंजाब पोलिसांनी कॅनडास्थित अर्श डल्ला आणि ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंग याच्याशी संबंधित चार मॉड्यूल सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 3 ग्रेनेड, 1 आयईडी, दोन 9 एमएम पिस्तूल आणि 40 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
Punjab Police has busted a Pak-ISI-backed terror module, with help of Delhi Police. 4 module members associated with Canada-based Arsh Dalla & Australia-based Gurjant Singh arrested. 3 hand-grenades, 1 IED & two 9mm pistols & 40 live cartridges recovered: DGP Punjab Police pic.twitter.com/JLIqxyWpsu
— ANI (@ANI) August 14, 2022
एप्रिलच्या सुरुवातीला पंजाब पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगने फरारी गुंड-दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ अर्श डल्लाच्या दोन जवळच्या साथीदारांना अटक केली होती. हर्ष कुमार आणि त्याचा साथीदार राघव दोघेही कोट इसे खान जिल्हा मोगा येथील रहिवासी होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 44 काडतुसांसह विदेशी एमपी-5 बंदूक जप्त केली आहे.
कोण आहे अर्श डल्ला
अर्श डल्ला हा पूर्वी सक्रिय गुंड आणि आता दहशतवादी आहे. तो मोगाचा रहिवासी असून, सध्या कॅनडामध्ये राहतो. तो अनेक दिवसांपासून गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. पंजाब पोलिसांनी आधीच अर्श डल्लाच्या अनेक मॉड्यूल्सचा पर्दाफाश केला असून, त्याच्या जवळच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आयईडी, ग्रेने, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली
स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले. दक्षिण द्वारका जिल्हा पोलिसांच्या पथकाने पालम परिसरातून तपासादरम्यान दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बांगलादेशच्या मंत्रालयांचे 10 बनावट रबर स्टॅम्प आणि अनेक पासपोर्ट जप्त केले आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची चौकशी सुरू आहे.