महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई, सौरभ चंद्राकरचा निकटवर्तीय रवी उप्पलला दुबईत ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:38 AM2023-12-13T09:38:27+5:302023-12-13T09:40:35+5:30

Mahadev BettingApp Case: महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या हाताला मोठं यश लागलं आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये सौरभ चंद्राकर याचा उजवा हात रवी उप्पलला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Major action in Mahadev betting app case, Saurabh Chandrakar's close associate Ravi Uppal arrested in Dubai | महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई, सौरभ चंद्राकरचा निकटवर्तीय रवी उप्पलला दुबईत ठोकल्या बेड्या

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई, सौरभ चंद्राकरचा निकटवर्तीय रवी उप्पलला दुबईत ठोकल्या बेड्या

महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या हाताला मोठं यश लागलं आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये सौरभ चंद्राकर याचा उजवा हात रवी उप्पलला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच त्याला भारतात आणण्याची तयारी केली जात आहे. रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटिस बजणावण्यात आली होती. या अटकेच्या कारवाईमुळे भारतीय तपास यंत्रणा सौरभ चंद्राकरच्या आणखी जवळ पोहोचल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेब बेटिंग ॲपचा मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरचं लोकेशनसुद्धा यूएईमध्येच सापडलं आहे. तसेत त्याच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. रवी उप्पल याच्यावर ऑनलाइन सट्टेबाजीसाठी ॲप तयार केल्याचा आरोप आहे. रवी उप्पल यांच्याशी संबंधित तपास छत्तीसगड पोलीस आणि मुंबई पोलिसांसोबतच कथित अवैध सट्टेबाजीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून केली जात आहे. 

भारतामध्ये छत्तीसगडसह विविध राज्यांच्या मोठ्या शहरांमध्ये महादेव बेटिंग ॲपचे सुमारे ३० कॉल सेंटर उघडले होते. ही कॉल सेंटर एक चेन बनवून अत्यंत खुबीने चालवली जात होती. सौरभ चंद्राकर आणि चंद्राकर आणि रवी उप्पल यांचे दोन निकटवर्तीय अनिल दम्मानी आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने भारतात ऑपरेट करत होता.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईमध्ये महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याचं लग्न झालं होतं. त्यामध्ये चार्टर्ड प्लेनमधून सुमारे १७ बॉलिवूड कलाकारांना बोलावण्यात आले होते. तिथे त्यांचा स्टेज परफॉर्मन्सही झाला होता. या परफॉर्मन्सच्या मोबदल्यात या कलाकारांना हवालाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये देण्यात आले होते. तसेच रणबीर कपूर याने महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपच्या एका सपोर्टिंग ॲपला प्रमोट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळेच दुबईतूल परफॉर्मन्समध्ये सहभागी झालेल्या त्या सर्व कलाकारांची चौकशी केली जात आहे.  

Web Title: Major action in Mahadev betting app case, Saurabh Chandrakar's close associate Ravi Uppal arrested in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.