गृहप्रवेशासाठी पुढील महिन्यात घेतली होती सुट्टी; २ वर्षीय चिमुकलीचे वडील सीमेवर शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 03:24 PM2023-09-14T15:24:42+5:302023-09-14T15:33:13+5:30

सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे.

Major Ashish Shaheed in terror attack anantnaug, father of 2-year-old girl died before entering home | गृहप्रवेशासाठी पुढील महिन्यात घेतली होती सुट्टी; २ वर्षीय चिमुकलीचे वडील सीमेवर शहीद

गृहप्रवेशासाठी पुढील महिन्यात घेतली होती सुट्टी; २ वर्षीय चिमुकलीचे वडील सीमेवर शहीद

googlenewsNext

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्याचे तीन मोठ्या रँकचे अधिकारी शहीद झाले. एक कर्नल, एक मेजर आणि एक डीएसपी होते. कोकेरनाग भागात जवानांवह हल्ला करणारे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यांना चारही बाजुंनी घेरले गेले होते. अचानक समोरून हल्ला झाला आणि यात राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर (मेजर) आशिष ढोचक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट यांना प्राण गमवावा लागला. 

सीमारेषेवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला असून शहीद सैन्य अधिकाऱ्यांचा अभिमान वाटत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्याबद्दल हळहळही व्यक्त होत डोळ्यात पाणीही येत आहे. या हल्ल्यात शहीद झालेले राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर (कर्नल) मनप्रीत सिंग व कंपनी कमांडर (मेजर) आशिष ढोचक हे पुढील महिन्यात सुट्टीवर घरी येणार होते. मात्र, बुधवारच्या रात्री त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त झळकले. 

मोहालीच्या मुल्लापूरच्या भडौजिया गावातील कर्नल मनप्रितसिंह २००३ मध्ये सैन्य दलात ले. कर्नल बनले होते. तर, २००५ मध्ये त्यांना कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती. ते कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सैन्य दलात सेवा बजावणारे अधिकारी होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून पुढील महिन्यात त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यासाठीच ते सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त झळकल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. 

पानीपतच्या बिझौल गावचे मेजर आशिष धोनचकचे वडिल लालचंद हे पानीपत येथील सेक्टर ७ मध्ये भाड्याच्या खोलीत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी टीडीआयमध्ये फ्लॉट घेऊन नवीन घराच्या बांधकामाचं काम हाती घेतलं होतं. पुढील महिन्यात २३ ऑक्टोबर रोजी मेजर आशिष यांच्या वाढदिनी नवीन घरात गृहप्रवेश होणार होता. त्यासाठी, सुट्टी घेऊन ते घरी येणार होते. मेजर आशिष हे तीन बहिणींचे एकुलते एक भाऊ होते. त्यांना २ वर्षाची मुलगीही आहे. यापूर्वी मार्च महिन्यात मेव्हण्याच्या लग्नासाठी ते आले होते, तेव्हाच आपल्या घरीही भेट दिली होती. मात्र, बुधवारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं.  

आशिष यांचा शौर्यपदकाने झाला होता सन्मान

दरम्यान, अनंतनाग येथे जवानांची टीम उंच जागेवर चढताच आधीच लपून बसलेल्या 2-3 दहशतवाद्यांनी समोरून गोळीबार सुरू केला. यात कर्नलचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या. त्यांना विमानाने श्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतू त्यांचे प्राण वाचले नाहीत. हे दहशतवादी लष्कर ए तौयबाच्या प्रॉक्सी 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) शी संबंधित होते. कर्नल मनप्रीत सिंग या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व करत होते.  सिंग यांना 2021 मध्ये शौर्यसाठी सेना पदक प्रदान करण्यात आले. तर मेजर आशिष ढोंचक यांना काही आठवड्यांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी शौर्यपदक प्रदान करण्यात आले होते. पोलीस अधिकारी हुमायून भट यांचे वडील जम्मू-काश्मीर पोलीस मधील आयजी पदावरून निवृत्त झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात कोकरमागचा अतिरेकी उझैर खान याचे नाव समोर आले आहे. हा संपूर्ण हल्ला त्याने दोन दहशतवाद्यांच्या साथीने केला आहे. 
 

Web Title: Major Ashish Shaheed in terror attack anantnaug, father of 2-year-old girl died before entering home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.