बिअर कारखान्यात बॉयलरचा मोठा स्फोट, त्याचे भाग ५०० मीटर अंतरावर सापडले; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:31 IST2025-04-07T13:44:02+5:302025-04-07T14:31:49+5:30

बरेलीतील इस्माईलपूर गावात एका बियर कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला आहे.

Major boiler explosion in beer factory, parts found 500 meters away many injured | बिअर कारखान्यात बॉयलरचा मोठा स्फोट, त्याचे भाग ५०० मीटर अंतरावर सापडले; अनेक जण जखमी

बिअर कारखान्यात बॉयलरचा मोठा स्फोट, त्याचे भाग ५०० मीटर अंतरावर सापडले; अनेक जण जखमी

उत्तर प्रदेशमधील एका बिअरच्या कारखान्याच्या बॉयलरचा स्फोट झाला आहे. बिशरतगंज पोलीस स्टेशन परिसरातील इस्माईलपूर गावात एका बियर कारखान्यात बॉयलर फुटल्याने मोठा स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर तो सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात पडला. या अपघातात पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्न करत आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

खळबळजनक! लंडनचा प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचा दावा; हार्ट ऑपरेशन केलेले ७ रूग्ण दगावले

ही घटना सकाळी ११:३० वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर कारखान्याचे व्यवस्थापक आणि कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले. मोठा आवाज ऐकू येताच गावकरी घराबाहेर पडले. यावेळी प्लांटमध्ये चेंगराचेंगरी आणि घबराटीचे वातावरण होते. माहिती मिळताच आओंला आणि बरेली येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. एडीएम प्रशासनही घटनास्थळी पोहोचले. सध्या प्लांटमध्ये चाचण्या सुरू आहेत आणि याच काळात ही दुर्घटना घडली.

Web Title: Major boiler explosion in beer factory, parts found 500 meters away many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.