हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:04 PM2020-07-16T20:04:10+5:302020-07-16T20:07:17+5:30

लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते.

major changes in health insurance; important to know the Corona period | हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

हेल्थ इन्शुरन्समध्ये मोठे बदल झाले; कोरोना काळात जाणून घेणे महत्वाचे

googlenewsNext

कोरोना संकटामध्ये (Coronavirus Pandemic) जर कोणी आजारी पडला तर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करणे आणि इन्शुरन्स कंपन्यांकडून नीट क्लेम सेटलमेंट करणे खुप अवघड झाले आहे. संकटाच्या काळात अशा बातम्या येत आहेत की कंपन्या कॅशलेस क्लेम  (Cashless claims) ला नकार देत आहेत. यामुळे इन्शुरन्सवर नियंत्रण ठेवणारी कंपनी IRDAI ने कोरोना काळात काही सूचना केल्या आहेत. ज्या आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत. 


IRDAI च्या निर्देशावर सर्व इन्शुरन्स कंपन्यांनी नुकतीच कोरोना महामारीचा खर्च कव्हर करण्यासाछी नवीन कोरोना कवच पॉलिसी लाँच केली आहे. यामध्ये कोरोना संबंधीचे सर्व खर्च कव्हर केले जातात. यासाठी विमा रक्कम 50000 ते 5 लाख आहे. 
IRDAI ने जारी केलेल्या सुचनांनुसार कोरोना कवच पॉलिसी शॉर्ट टर्मसाठी म्हणजेच साडे तीन महिने, साडे सहा महिने आणि साडे नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी असू शकते. यामध्ये 50000 रुपयांच्या पटींमध्ये 5 लाखांपर्यंत विमा रक्कम येते. ही कोरोना कवच पॉलिसी सर्व 30 जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांना बंधनकारक आहे. 


14 जुलैला इरडाने जारी केलेल्या नोटिशीमध्ये याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. कोणतीही कंपनी कोरोना उपचारासाठी कॅशलेस फॅसिलिटी नाकारू शकत नाही. याबाबत इन्शुरन्स कंपन्यांनाही कडक सूचना करण्यात आली आहे. कंपन्यांनी अशी यंत्रणा तयार करावी ज्यामध्ये केवळ कोरोनाची प्रकरणे पाहिली जातील. याचसोबत कोरोना वॉरिअरसाठी इन्शुरन्स कंपन्यांना प्रिमिअमध्ये सूट देण्यास सांगितले आहे. डॉक्टर, नर्स आणि हेल्थकेअरशी संबंधित लोकांना कोरोना कवच पॉलिसीवर 5 टक्क्यांची सूट मिळणार आहे.


लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते. तसेच मार्च आणि एप्रिलमध्ये विमा नुतनीकरण करण्यासाठी जास्त वेळ दिला होता.

अन्य महत्वाच्या बातम्या....

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

ब्रेझा, व्हेन्यूला विसरणार; नवी एसयुव्ही Magnite पाहताच भले भले व्वा म्हणणार

अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

चिनी स्मार्टफोन नकोय? सॅमसंगने स्वस्त Galaxy M01s लाँच केला; जाणून घ्या किंमत

कुठेय लॉकडाऊन; कुठेय मंदी! भारतातल्या सर्वांत महागड्या फ्लॅटची खरेदी; किंमत पाहून हादराल

Web Title: major changes in health insurance; important to know the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.