पंजाबची मोठी शहरे गुजरातच्या बंदरांना जोडणार; २०२४ पर्यंत होणार अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 08:24 AM2022-05-21T08:24:46+5:302022-05-21T08:26:03+5:30

२६००० कोटी रुपयांच्या खर्चाने भारतमाला योजनेअंतर्गत बनविण्यात येणारा १२२४ किमीचा लांब अमृतसर- जामनगर एक्स्प्रेस वे पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. 

major cities of punjab will be connected to ports of gujarat amritsar jamnagar expressway to be constructed by 2024 | पंजाबची मोठी शहरे गुजरातच्या बंदरांना जोडणार; २०२४ पर्यंत होणार अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वे

पंजाबची मोठी शहरे गुजरातच्या बंदरांना जोडणार; २०२४ पर्यंत होणार अमृतसर-जामनगर एक्स्प्रेस वे

Next

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : पंजाबमधील धान्य आणि हरयाणात बनणाऱ्या कार, दुचाकी यांना आता लवकरच गुजरातच्या बंदरांवर निर्यातीसाठी नेण्यात येईल. २६००० कोटी रुपयांच्या खर्चाने भारतमाला योजनेअंतर्गत बनविण्यात येणारा १२२४ किमीचा लांब अमृतसर- जामनगर एक्स्प्रेस वे पुढीलवर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. 

या योजनेवर तीन वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ झाला होता. यावर्षीच्या अखेरपर्यंत बिकानेर ते जोधपूरपर्यंत २७५ किमीचा एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा कॉरिडॉर बनल्यानंतर अमृतसरहून जामनगरचे अंतर जवळपास २०० किमीने कमी होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी २६ तास लागतात. एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हे अंतर कमी होऊन केवळ १३ तास लागतील. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून गुजरातच्या कांडला, मुंद्रा आणि पोरबंदर व जामनगर यासारखे बंदर राजस्थान, पंजाब आणि हरयाणाच्या मोठ्या शहरांशी जोडले जातील. या एक्स्प्रेस वेचा जवळपास १००० किमीचा भाग ग्रीन फिल्ड म्हणजेच नव्याने बनविण्यात येईल.

Web Title: major cities of punjab will be connected to ports of gujarat amritsar jamnagar expressway to be constructed by 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.