Covaxin Vaccine: महाराष्ट्र वन विभागाशिवाय कोव्हॅक्सिन बनविणे अशक्य होते; ICMR च्या डॉ. बलराम भार्गवांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:53 AM2021-11-15T09:53:47+5:302021-11-15T09:54:48+5:30

ICMR Dr Balram Bhargava talks about the journey of India's homegrown vaccine: आयसीएमआरच्या महासंचालकांनी कोरोना साथीवर औषधे शोधण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने, लस तयार करण्यासाठी प्रयोगशाळा नेटवर्क विकसित करणे, निदान, उपचार आणि सिरो सर्व्हेपर्यंतचे नवीन तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.

Major contribution of Maharashtra Forest Department in making Covaxin; found 20 rhesus monkey from Nagpur | Covaxin Vaccine: महाराष्ट्र वन विभागाशिवाय कोव्हॅक्सिन बनविणे अशक्य होते; ICMR च्या डॉ. बलराम भार्गवांचा गौप्यस्फोट

Covaxin Vaccine: महाराष्ट्र वन विभागाशिवाय कोव्हॅक्सिन बनविणे अशक्य होते; ICMR च्या डॉ. बलराम भार्गवांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

भारताची स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला जगातील अनेक देशांनी मान्यता दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की लसीच्या चाचणीत रीसस माकडांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'गोइंग व्हायरल: मेकिंग ऑफ कोवॅक्सिन द इनसाइड स्टोरी' या पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारतातील स्वदेशी लस बनवणे, चाचणी आणि मान्यता याबद्दल अशा काही गोष्टींचा उल्लेख केला आहे, ज्याबद्दल कोणालाही अद्याप माहिती नाही.

या पुस्तकात आयसीएमआरच्या महासंचालकांनी कोरोना साथीवर औषधे शोधण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने, लस तयार करण्यासाठी प्रयोगशाळा नेटवर्क विकसित करणे, निदान, उपचार आणि सिरो सर्व्हेपर्यंतचे नवीन तंत्रज्ञान यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. डॉ. भार्गव म्हणतात की, लसीच्या यशामागचे नायक फक्त मानव नाहीत, कारण त्यात 20 माकडांचे योगदान आहे. तसेच महाराष्ट्र वनविभागाचे मोठे योगदान आहे. ज्यामुळे आपल्यापैकी लाखो लोकांकडे आता जीवनरक्षक लस आहे. आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो होतो, जिथे आम्हाला माहित होते की लस लहान प्राण्यांमध्ये अँटीबॉडीज तयार करू शकते, तेव्हा पुढची पायरी म्हणजे माकडांसारख्या मोठ्या प्राण्यांवर त्याची चाचणी करणे. ज्यांच्या शरीराची रचना आणि रोगप्रतिकारक शक्ती माणसांसारखीच असते. जगभरातील वैद्यकीय संशोधनात वापरले जाणारे रीसस मॅकॅक माकड या प्रकारच्या संशोधनासाठी सर्वोत्तम मानले जातात.

लस कशी विकसित केली गेली...
ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची लेव्हल 4 प्रयोगशाळा, जी प्राइमेट अभ्यासासाठी भारतातील एकमेव अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे. हे महत्त्वाचे संशोधन करण्याचे आव्हान पुन्हा एकदा स्वीकारले. यानंतर सर्वात मोठी अडचण होती की रीसस मॅकाक माकडं कुठून आणायची कारण भारतात रीसस मॅकाकची प्रजोत्पादन प्रयोगशाळांमध्ये नाही? यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी भारतातील अनेक प्राणीसंग्रहालय आणि संस्थांशी संपर्क साधला. यासाठी तरुण माकडांची गरज होती.

लसीच्या चाचणीसाठी, ICMR-NIV च्या टीमने महाराष्ट्रातील काही भागात माकडांना ओळखण्यासाठी आणि पकडण्यासाठी भेट दिली. त्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे या माकडांसमोर अन्नाचे संकट निर्माण झाले होते, त्यामुळे ते घनदाट जंगलात गेले होते. यानंतर शास्त्रज्ञांच्या मदतीसाठी महाराष्ट्र वनविभागाने हजारो चौरस किलोमीटर जंगलांमध्ये या माकडांचा शोध घेतला. तेव्हा नागपुरात ही माकडे सापडल्याचे भार्गव म्हणाले.

Web Title: Major contribution of Maharashtra Forest Department in making Covaxin; found 20 rhesus monkey from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.