जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत 100 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:58 PM2022-06-13T16:58:29+5:302022-06-13T18:11:24+5:30

Jammu Kashmir: 1 जानेवारी 2022 ते 12 जून 2022 पर्यंत खोऱ्यातील 160-180 सक्रीय दहशतवाद्यांपैकी 100 जणांचा खात्मा झाला आहे.

Major crackdown on terrorists in Jammu and Kashmir; 100 terrorists killed in this year | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत 100 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत 100 दहशतवादी ठार

Next

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आउट वेगाने सुरू आहे. 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या 160-180 दहशतवाद्यांपैकी 12 जूनपर्यंत सुरक्षा दलांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काश्मरीचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, या वर्षाच्या 5 महिने आणि 12 दिवसांत ठार झालेल्या 100 दहशतवाद्यांपैकी 71 स्थानिक तर 29 विदेशी दहशतवादी आहेत. सर्व विदेशी दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी लष्कर-ए-तैयबाला (LET) सर्वाधिक नुकसान झाले असून, त्यांचे 63 दहशतवादी मारले गेले आहेत.

जैश-ए-मोहम्मदचे 24 दहशतवादी ठार
तसेच, जैश-ए-मोहम्मद (JeM) ने 24 दहशतवादी गमावले आहेत. बाकीचे अन्सार-गजवातुल हिंद आणि ISJK चे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात 27 दहशतवादी मारले गेले, एप्रिलमध्ये 24, मार्चमध्ये 13, फेब्रुवारीमध्ये 7 आणि जानेवारीमध्ये 20 दहशतवादी मारले गेले. तसेच, जूनच्या पहिल्या 12 दिवसांत 9 दहशतवादी मारले गेले आहेत.

2021 मध्ये 50 दहशतवादी मारले 
ही संख्या 2021 मध्ये याच काळात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. 2021 मध्ये याच कालावधीत सुरक्षा दलांनी 49 स्थानिक आणि 1 परदेशी दहशतवाद्यांसह 50 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 

Web Title: Major crackdown on terrorists in Jammu and Kashmir; 100 terrorists killed in this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.