दिवाळीआधी दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी रोखली; कॅप्टनसह तीन जवान शहीद
By हेमंत बावकर | Published: November 8, 2020 02:54 PM2020-11-08T14:54:07+5:302020-11-08T14:59:24+5:30
Encounter in Jammu Kashmir: शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले.
जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
#UPDATE One captain and two soldiers have lost their lives in the ongoing operation in Machil Sector. Three terrorists have been eliminated. Operation underway: Army Sources#JammuAndKashmir
— ANI (@ANI) November 8, 2020
शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
#UPDATE Constable Sudip Sarkar lost his life during the operation in Machil Sector. Reinforcements received from Indian Army. Joint operation still underway: Border Security Force (BSF). #JammuAndKashmirhttps://t.co/M9rZTcaoaO
— ANI (@ANI) November 8, 2020
शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके 47 रायफल आणि 2 बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.