उरी सेक्टरमध्ये जवानाकडून मेजरची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:18 AM2017-07-18T11:18:05+5:302017-07-18T11:39:27+5:30
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे.
ऑनलाइन लोकमत
स्फोटकाचे नमुने आग्राला पाठवलेच नाहीत, उत्तर प्रदेश सरकारचं स्पष्टीकरण
स्मृती इराणी यांना माहिती व प्रसारण मंत्रिपद
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्युटीवर असताना जवानाला मोबाइल फोन वापरायला मनाई करण्यात आली होती. मेजरच्या या निर्णयामुळे नाराज असलेल्या जवानाने गोळी चालविल्याचं कळतं आहे. आरोपी जवान जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये तैनात आहे. गोळी लागल्याने मेजर थापा यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी जवावाने मेजरला मागून एके-47 मधून पाच गोळ्या झाडल्या. दरम्यान लष्कराने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मेजर शेखर थापा 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. ज्या ठिकाणी मेजर ड्युटीवर तैनात होते ती जागा एलओसीपासून खूप जवळ आहे. या घटनेला लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ड्युटीवर असलेला जवान मोबाइल फोनचा वापर करत होता. त्याला बघून मेजर शेखर थापा यांनी त्या जवानाला हटकलं तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं. या मुद्द्यावरून दोघांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या धक्काबुक्कीत जवानाचा फोट तुटला. त्यामुळे दोघांमध्ये सुरू झालेला वाद टोकाला गेला होता. या कारणावरून त्या जवानाने मेजर थापा यांना गोळ्या मारल्या.