मेजर नाना वाणी यांना जामीन जळगावात येण्यास बंदी : घरकूल प्रकरणात जामीन मिळणारे तिसरे आरोपी
By Admin | Published: December 7, 2015 11:59 PM2015-12-07T23:59:46+5:302015-12-07T23:59:46+5:30
जळगाव- घरकूल प्रकरणातील आरोपी जगन्नाथ ऊर्फ मेजर नाना वाणी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात न्या.पीनाकी चंद्र बोस व ए.के.अग्रवाल यांच्यासमोर कामकाज झाले. वाणी यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री ॲड.कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ॲड.कंटेश्वरकर यांनी बाजू मांडली.
ज गाव- घरकूल प्रकरणातील आरोपी जगन्नाथ ऊर्फ मेजर नाना वाणी यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयात न्या.पीनाकी चंद्र बोस व ए.के.अग्रवाल यांच्यासमोर कामकाज झाले. वाणी यांच्यातर्फे माजी केंद्रीय मंत्री ॲड.कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ॲड.कंटेश्वरकर यांनी बाजू मांडली. जळगावात येण्यास बंदीवाणी यांना जळगावात येण्यास बंदी आहे. पण ते इतरत्र कुठल्याही शहरात वास्तव्य करू शकतात. त्यासंबंधीची माहिती त्यांना संबंधित शहर किंवा जिल्ाचे पोलीस अधीक्षक, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना द्यावी लागेल. पण जळगावात येण्यासाठी त्यांना न्यायालय किंवा पोलीस यंत्रणा आदींची परवानगी घेण्यासंबंधीची अट टाकण्यात आलेली नाही. घरकूल प्रकरणात यापूर्वी गुलाबराव देवकर, माजी महापौर प्रदीप रायसोनी व आता मेजर नाना वाणी यांना जामीन मिळाला आहे. २०१२-२०१५घरकूल योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या संशयावरून महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी जळगाव शहर पोलिसात २००६ मध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार ९० नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील तपासाधिकारी यांनी खान्देश बिल्डर्सचे संचालक मेजर नाना वाणी यांना अटक केली होती. यापूर्वी एक दिवस आधी म्हणजेच २८ जानेवारी २०१२ रोजी या प्रकरणात राजा मयूर, प्रदीप रायसोनी व पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे यांना तपासाधिकार्यांनी अटक केली होती. जामीन मंजूर झाल्यानंतर वाणी हे तीन वर्ष १० महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहे.