छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, IED स्फोट घडवून बस उडवली; ५ जवानांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:10 PM2021-03-23T20:10:53+5:302021-03-23T20:14:42+5:30
Naxal attack in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य करत पुन्हा एकदा एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जात असलेली बस आयईडी स्फोट घडवून उडवून दिली.
रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य करत पुन्हा एकदा एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जात असलेली बस आयईडी स्फोट घडवून उडवून दिली. या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले आहे. तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या हल्ल्यात एकूण १० जवान जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
जवानांच्या बसवर हा हल्ला नारायणपूर येथे करण्यात आला. डीआरजीचे जवान एका मोहिमेवरून परतत होते. तेव्हा त्यांच्या बसला नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्याच्या घटनेला एसपी मोहित गर्ग यांनी दुजोरा दिला आहे. दबा धरून बसलेल्या नक्षवाद्यांनी जवानांच्या बसवर हल्ला केला, असे त्यांनी सांगितले.
Chhattisgarh: Three District Reserve Guard (DRG) jawans and one police personnel lost their lives in an IED blast by naxals in Narayanpur today. 14 security personnel injured, including two critical.
— ANI (@ANI) March 23, 2021
(Pic Source: ITBP) pic.twitter.com/qlCPJmQXpl
नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलेल्या बसमधून डीआरजीचे २४ जवान प्रवास करत होते. हे सर्व जवान कडेनार येथून मंदोडा येथे जात होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून बस ऊडवली. या स्फोटात पाच जवानांना जागेवरच वीरमरण आले. तर १० जवान जखमी झाले. यातील काही जवानांची प्रकृती गंभीर आहे.