तटरक्षक दलाची मोठी कारवाई, भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी जहाजासह 12 जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:37 PM2021-09-16T14:37:38+5:302021-09-16T14:38:00+5:30

गुजरात सीमेवर तैनात असलेल्या 'राजरत्न' जहाजाने या पाकिस्तानी जहाजाला पकडलं.

A major operation by the Coast Guard, arrested 12 people including a Pakistani ship entering India | तटरक्षक दलाची मोठी कारवाई, भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी जहाजासह 12 जण ताब्यात

तटरक्षक दलाची मोठी कारवाई, भारतात घुसणाऱ्या पाकिस्तानी जहाजासह 12 जण ताब्यात

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडलं आहे. तसेच, या बोटीवर असलेल्या 12 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. गुजरातच्या ओखाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडण्यात आलं आहे. तसेच, या बोटीवरील 12 जणांना ताब्यात घेण्यात आलयं. गुजरात सीमेजवळ घुसखोरांचा मागोवा घेणाऱ्या 'राजत्न' या भारतीय जहाजाने पाळत 'अल्लाह पावावाकल' नावाच्या पाकिस्तानी जहाजाला पाहिले. त्यानंतर त्यांनी मोठी कारवाई करत या जहाजाला आणि त्यावरील बारा जणांना ताब्यात घेतलं. सध्या हे जहाज गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील ओखा येथे आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: A major operation by the Coast Guard, arrested 12 people including a Pakistani ship entering India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.