मराठा क्रांती मूक मोर्चानिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल

By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:50+5:302016-09-22T01:16:50+5:30

नाशिक : कोपर्डी अल्पवयीन मुलगी अत्याचार, मराठा आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यातील बदल यांसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि़ २४) शहरात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोर्चामध्ये जिल्‘ाच्या विविध ठिकाणांहून सुमारे पंधरा लाख मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे़ या मोर्चाच्या कालावधीत व मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे़

Major reshuffle of traffic in the city of Maratha revolution; | मराठा क्रांती मूक मोर्चानिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल

मराठा क्रांती मूक मोर्चानिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे फेरबदल

Next
शिक : कोपर्डी अल्पवयीन मुलगी अत्याचार, मराठा आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यातील बदल यांसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि़ २४) शहरात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोर्चामध्ये जिल्‘ाच्या विविध ठिकाणांहून सुमारे पंधरा लाख मराठा समाजबांधव सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे़ या मोर्चाच्या कालावधीत व मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे़

* मराठा मूक मोर्चाचा मार्ग :- तपोवन कमान - स्वामीनारायण चौक - संतोष टी पॉईंट - काट्या मारुती चौक - निमाणी बस स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल - सीबीएस - गोल्फ क्लब मैदाऩ

* पेठ, हरसूल, गिरणारे, मखमलाबाद या बाजूकडून येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी आपली वाहने पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीमध्ये पार्किंग करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जावे़

* दिंडोरी, कळवण या बाजूकडून येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी आपली वाहने दिंडोरी रोडवरील मेरी तसेच महालक्ष्मी चित्रपटगृहासमोरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्क करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जावे़

* मालेगाव, बागलाण, देवळा, चांदवड, पिंपळगाव, ओझर या बाजूकडून येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी रासबिहारी स्कूल येथून डावीकडे वळून निलगिरीबाग येथील जागेत आपली वाहने पार्क करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जावे़

* येवला, नांदगाव, लासलगाव, निफाड, चांदोरी, सायखेडा या बाजूकडून येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी डावीकडे वळून जय शंकर फेस्टिव्हल (जेजूरकर मळा) येथील जागेत आपली वाहने पार्क करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जावे़

*सिन्नर, भगूर, देवळाली, नाशिकरोड या बाजूकडून येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी फेम थिएटरपासून उजवीकडे वळून ड्रिमसिटी चौकातून डावीकडे वळून तपोवन रस्त्याने मारुती वेफर्स चौकातून लक्ष्मीनारायण पुलाशेजारी गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील मैदानावर आपली वाहने पार्क करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जावे़

* इगतपुरी, घोटी बाजूकडून मुंबई आग्रारोडने येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी उड्डाणपुलावरून द्वारका चौकात खाली उतरून महामार्गाने पंचवटी महाविद्यालय येथे उजव्या बाजूला वळतील़ तेथून पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन्स येथे डाव्या बाजूला वळतील व चव्हाण मळ्यातील मैदानात आपली वाहने पार्क करावी़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जातील़

* त्र्यंबकेश्वर मार्गे येणारी वाहतूक- या मार्गावरून मोर्चासाठी येणारे समाजबांधव हे अंबड टी पॉईंट पपया नर्सरी येथून उजव्या बाजूकडे वळून अंबड लिंकरोडने एक्सलो पॉईंटवरून गरवारे टी पॉईंटवरून लोकमतजवळील रॅमवरून उड्डाणपुलामार्गे द्वारका येथून खाली उतरून महामार्गाने पंचवटी महाविद्यालय येथे उजव्या बाजूला वळतील़ तेथून पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन्स येथे डाव्या बाजूला वळतील व चव्हाण मळ्यातील मैदानात आपली वाहने पार्क करतील़ या ठिकाणाहून पायी मार्गाने तपोवनात मोर्चाच्या ठिकाणी जातील़

* मराठा मूक क्रांती मोर्चासाठी येणार्‍या समाजबांधवांनी मोर्चासंपेपर्यंत वरील मार्गावरून वळविण्यात आल्याप्रमाणे वाहतूक मार्गाचा अवलंब करावा़

Web Title: Major reshuffle of traffic in the city of Maratha revolution;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.