गंगेसह प्रमुख नद्या कोपल्या
By admin | Published: August 24, 2016 05:12 AM2016-08-24T05:12:59+5:302016-08-24T05:12:59+5:30
बिहार आणि उत्तर प्रदेशात (यूपी) गंगेसह प्रमुख नद्या कोपल्या असून, लाखो लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.
नवी दिल्ली : बिहार आणि उत्तर प्रदेशात (यूपी) गंगेसह प्रमुख नद्या कोपल्या असून, लाखो लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. एकट्या बिहारमध्ये २२ जण मृत्युमुखी पडले.
बिहारात गंगा, सोन, पुनपुन, बुढी गंडक, घाघरा आणि कोसी या नद्यांना पूर आला आहे. हवामान खात्याने राज्यातील पाटणा, गया, भागलपूरसह इतर काही ठिकाणी पुढील २४ तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.
उत्तर प्रदेशात गंगा, इलाहाबाद, मिर्जापूर, वाराणसी, गाजीपूर आणि बलिया येथे यमुना, शारदा आणि केन या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली. बलियात गंगेची पाणीपातळी ६०.३० मीटरवर पोहोचली आहे. वाराणसीत सुमारे २०० गावांना, गाजीपूरमध्ये २३०, चंदौलीत ११५, बलियात १२५, मिर्जापूरमध्ये ३००, भदोहीत २०, जौनपूरमध्ये १२, आजमगडमध्ये ११ आणि मऊमधील सात गावांना पुराचा तडाखा बसला. पुरामुळे वाराणसी, बलियात शाळा बंद करण्यात आल्या असून, वाहतूक बंद झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)