हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 03:39 PM2018-03-31T15:39:28+5:302018-03-31T15:46:26+5:30

त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली.

Major Satish Dahiya girl put Shaurya Chakra on his uniform photos get viral | हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

Next

भिवानी: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर सतीश दहिया यांच्या चिमुकलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वी मेजर सतीश दहिया यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकरवी मरणोत्तर शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. मेजर दहिया यांच्या आई व पत्नीने हा पुरस्कार स्वीकारला होता. हा पुरस्कार घरी घेऊन आल्यानंतर मेजर दहिया यांची मुलगी प्रियांशा हिने शौर्य पदक आपल्या वडिलांच्या गणवेशावर लावले. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत 900 जणांना हा फोटो रिट्विट केला आहे तर 2500 हून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. फेसबुकवरही अनेक जणांकडून हा फोटो शेअर केला जात आहे. शहीद मेजर सतीश दहिया यांचे कुटुंब भिवानीनजीक असणाऱ्या बनिहाडी गावात वास्तव्याला आहे. 

मेजर सतीश दहिया यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्यावेळी तीन गोळ्या लागल्या होत्या. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र, तरीदेखील त्यांनी मागे न हटता दहशतवाद्यांशी मुकाबला केला. यादरम्यान त्यांच्या छातीत आणखी दोन गोळ्या लागल्या. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. त्यामुळे रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेजर दहिया यांच्या शरीरातून मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाला. परिणामी त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.







 

Web Title: Major Satish Dahiya girl put Shaurya Chakra on his uniform photos get viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.