चंदन गुप्ता हत्याकांडात मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:04 IST2025-01-03T15:56:32+5:302025-01-03T16:04:54+5:30
कासगंज येथील चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

चंदन गुप्ता हत्याकांडात मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे २६ जानेवारी २०१८ रोजी निघालेल्या तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ता यांची हत्या झाली. या प्रकरणी राष्ट्रीय तसाप संस्थेच्या विशेष कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने गुरुवार २ जानेवारी रोजी २८ आरोपींना दोषी ठरवले आहे. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी दोषिंना शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने २८ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पंतप्रधान मोदींनी दिले २५ लाखांचे घर अवघ्या १.७२ लाखांत; दिल्लीत केजरीवालांना टोलेही लगावले
एनआयए न्यायालयाची कायदेशीरता आणि सुनावणीला स्थगिती देण्याबाबत आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हा अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर लखनौच्या एनआयए विशेष न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला, यावेळी न्यायालयाने शिक्षा सुनावली. सुमारे ८ वर्षे जुन्या प्रकरणात चंदन यांच्या वडिलांनी कासगंज पोलीस ठाण्यात २० नावाजलेल्या आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
लखनौ कारागृहात शिक्षा भोगत असलेले २६ दोषी आहेत. यामध्ये वसीम जावेद उर्फ वसीम, नसीम जावेद, मोहम्मद जाहिद कुरेशी उर्फ जाहिद उर्फ जग्गा, आसिफ कुरेशी उर्फ हिटलर, अस्लम कुरेशी, अक्रम, तौफिक, खिल्लान, शवाब अली खान, राहत, सलमान, मोहसीन, आसिफ कुरेशी, आ. साकिब, बबलू, निशू उर्फ झीशान, वासीफ, कासगंज तुरुंगात बंद इमरान, शमशाद, जफर, साकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, साकीर, मोहम्मद आमिर रफी, मुनाजीर आणि कोर्टात शरण आलेल्या सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लखनौ तुरुंगातून २६ दोषी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले आहेत. कासगंज तुरुंगाशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोषी मुनाजीरचा संबंध आहे.
या शिक्षेनंतर चंदन गुप्ता यांचे वडिलांनी प्रतिक्रिया दिली. या न्यायामुळे आम्ही खुश आहोत. न्यायाधीस आणि सर्वच लोकांचे आम्ही आभार मानतो. न्यायालयाने आमची साथ दिली आणि वकीलांनीही आम्हाला मदत केली.