हवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसविणे अंगलट

By Admin | Published: April 24, 2016 04:11 AM2016-04-24T04:11:44+5:302016-04-24T04:11:44+5:30

एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान हवाई सुंदरीला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये बळजबरीने बसविणाऱ्या वैमानिकाची स्पाईसजेटने हकालपट्टी केली आहे. आरोपी वैमानिकाने सदर

To make the aerospace fit in the cockpit | हवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसविणे अंगलट

हवाईसुंदरीला कॉकपिटमध्ये बसविणे अंगलट

googlenewsNext

नवी दिल्ली : एका आंतरराष्ट्रीय उड्डाणादरम्यान हवाई सुंदरीला आपल्यासोबत कॉकपिटमध्ये बळजबरीने बसविणाऱ्या वैमानिकाची स्पाईसजेटने हकालपट्टी केली आहे. आरोपी वैमानिकाने सदर हवाईसुंदरीला केवळ कॉकपिटमधील आपल्या आसनावरच बसविले नाही तर सहवैमानिकांना कॉकपिटबाहेरही काढले होते. बराच वेळ वैमानिक आणि हवाईसुंदरी कॉकपिटमध्ये एकटेच होते.
गेल्या २८ फेब्रुवारीला कोलकाता येथून बँकॉकला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. अखेर दोन महिन्यांनंतर स्पाईसजेटने त्या वैमानिकाला बडतर्फ केले.
कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कॉकपिटमध्ये पायलटच्या जागी बसविणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्याचप्रमाणे विमानात हवाई सुंदरीचे शारीरिक शोषण हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. या महाभाग वैमानिकाने त्याच दिवशी रात्री परत येतानाही ही लज्जास्पद वर्तणूक केली होती.
आरोपी वैमानिकाने मुख्य हवाई सुंदरीशी बोलताना चुकीची भाषा वापरली नसती तर कदाचित हे प्रकरण उघडही झाले नसते. पीडित हवाई सुंदरीने यासंदर्भात एअरलाईन्सकडे तक्रार केली. त्यानंतर स्पाईसजेटने अंतर्गत चौकशी करून नागरी उड्डयण महासंचालनालयाला याबाबत माहिती दिली. या वैमानिकाला बडतर्फ करण्याचा निर्णय स्पाईसजेटचे अध्यक्ष अजयसिंग यांनी स्वत: घेतला असल्याची माहिती आहे. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली असून आरोपी वैमानिकाची एवढ्यावरच सुटका होणार नाही असे संकेत आहेत. डीजीसीएचे प्रमुख एम. साथियावथी यावर लक्ष ठेवून आहेत. या वैमानिकाविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

 

Web Title: To make the aerospace fit in the cockpit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.