'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:39 PM2023-08-30T12:39:09+5:302023-08-30T12:40:43+5:30
मुंबईत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे, या बैठकी अगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा जोरदार सुरू आहे.
देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विरोधी पक्षांनीही तयारी केली असून, आता देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत I.N.D.I.A ची स्थापन केली. पहिली बैठक बिहारमध्ये तर दुसरी बैठक बंगळूरमध्ये झाली, आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. दरम्यान, या बैठकीअगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवा अशी मागणी होत आहे.
१०० महिने लूट, नंतर २०० रुपयांची सूट! गॅस सबसिडीवरून अखिलेश यादवांनी हाणला टोला
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी ही मागणी केली आहे.कक्कर म्हणाल्या, " अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले पाहिजे." या महागाईतही देशाची राजधानी दिल्लीत महागाई सर्वात कमी आहे.दिल्लीत मोफत पाणी, मोफत वीज, मोफत शिक्षण, महिलांसाठी मोफत बस प्रवास, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे ते म्हणाले. असे असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
कक्कर म्हणाल्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि ते पंतप्रधान मोदींविरोधात आव्हानात्मक म्हणून समोर आले आहेत.
आप'च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, मेक इंडिया नंबर 1 मिशन अंतर्गत, आम्हाला देशातच वस्तू बनवायला हव्या आहेत. पीएम मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले होते की, जेव्हा आपण वस्तू आयात करतो तेव्हा महागाई देखील आयात केली जाते. हे असे का होते, ते होत आहे कारण त्यांच्याकडे आर्थिक मिशन नाही. येथे उत्पादन मायनसमध्ये गेले आहे.
'केजरीवाल यांच्या व्हिजनमध्ये भारत हे उत्पादन केंद्र बनणार आहे. जिथे लायसन्स राज संपेल. व्यापाऱ्यांना कामाचे वातावरण मिळेल. जिथे शिक्षण उच्च पातळीवर असेल तिथे मुले शोध घेण्याचा विचार करतील. शिक्षण अशा पातळीवर असेल की परदेशी मुले डॉलर खर्च करून शिकायला येतील. मोदी सरकारने काही व्यापाऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, कल्पना करा या पैशातून किती राज्यांना मोफत वीज मिळाली असती, असंही कक्कर म्हणाल्या.
#WATCH | AAP's Chief National Spokesperson Priyanka Kakkar says, "If you ask me, I would want Arvind Kejriwal to be the Prime Ministerial candidate. Even in such back-breaking inflation, the national capital Delhi has the lowest inflation. There is free water, free education,… pic.twitter.com/vMUquowQU6
— ANI (@ANI) August 30, 2023