मटका कायदेशीर करा!
By admin | Published: August 11, 2015 11:16 PM2015-08-11T23:16:03+5:302015-08-11T23:16:03+5:30
(वाघांच्या फोटोसह)
Next
(व ाघांच्या फोटोसह)वाघ गुरगुरले : कॅसिनोंमधील उधळप?ी चालते, तर मटक्याला विरोध का?पणजी : मटका जुगार कायदेशीर करा, अशी मागणी यापूर्वी क्वचितच एखाद्या आमदाराने विधानसभेत केली आहे. सांत आंद्रेचे आमदार तथा साहित्यिक विष्णू वाघ यांनी मात्र मंगळवारी विधानसभेत बोलताना मटका जुगार कायदेशीर करता येईल काय, या विषयी सरकारकडून विचार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रश्नोत्तराच्या तासावेळी मूळ प्रश्न फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांनी मांडला होता. अर्थात मटका कायदेशीर करा, अशी मामलेदार यांची मागणी नव्हती. फोंड्यात मटक्याविरुद्ध पोलीस जी कारवाई करतात, ती केवळ वरवरची असून फुटपाथवरील छोट्या मटका व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे नोंदविले जातात; पण मोठय़ा बुकींविरुद्ध कारवाई होत नाही. स्थानिक तरुणही मटक्यात गुंतलेले आहेत. जे बुकी फोंड्यातील सगळा मटका नियंत्रित करतात, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद झालेले नाहीत, असे मुद्दे आमदार मामलेदार यांनी मांडले. मटका वाढला असल्याचे सरकारी आकडेवारीवरून कळून येते, असेही मामलेदार यांनी नमूद केले. काही विशिष्ट कालावधीत पोलिसांना टार्गेट दिले जाते. त्यामुळे ते कारवाई केल्याचे व गुन्हे नोंदविल्याचे दाखवतात, असे मामलेदार म्हणाले.मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मामलेदार यांचे हे म्हणणे मान्य केले नाही. मटका आता नियंत्रणात आहे, असा दावा पार्सेकर यांनी केला. उलट मटक्याविरुद्ध कारवाई वाढली आहे. खटलेही भरले जात आहेत. अधिकाधिक गुन्हे झालेले असल्याने त्या आधारे मटका नियंत्रणात आहे, असा निष्कर्ष काढता येतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांना टार्गेट देण्यासाठी हा काही डिसेंबर महिना नव्हे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मटका जुगार कधी बंद केला जाईल, अशी विचारणा मामलेदार यांनी केली. यावेळी आमदार वाघ यांनी एक उपप्रश्न मांडला. जे लोक लाखो रुपये घेऊन कॅसिनोमध्ये खेळतात, त्या कॅसिनोला कायदेशीर मान्यता आहे. तसेच तुम्ही मटक्याला कायदेशीर रुप का देत नाही, अशी विचारणा वाघ यांनी केली. मटका हा खूप विश्वासार्हततेवर चालतो. एका कागदाच्या तुकड्यावर जे आकडे लिहून दिले जातात, त्यानुसार मटका व्यवस्थित चालतो. तो कायदेशीर होईल, अशी भीती पोलिसांनाच दिसते, असे वाघ म्हणाले.अर्थात वाघ यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री पार्सेकर यांनी काही भाष्य केले नाही. तत्पूर्वीच प्रश्नोत्तराचा तास संपला. (खास प्रतिनिधी)