मला आमदार बनवा आणि नशापाणी, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा; भाजपा नेत्याचे अजब आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:13 AM2019-10-10T11:13:53+5:302019-10-10T11:14:31+5:30
निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नेत्यांकडून वाटेल तशी आश्वासने दिली जातात.
फतेहाबाद, (हरयाणा) - निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यावर मतदारांना आकर्षिक करण्यासाठी नेत्यांकडून वाटेल तशी आश्वासने दिली जातात. आता असाच एक प्रकार हरयाणामधील फतेहाबाद येथून समोर आला आहे. येथील भाजपा उमेदवाराने मतदारांना चक्क ''मला आमदार बनवा आणि नशापाणी, शिक्षण, वाहनांवरील दंड यांची चिंता करणे सोडून द्या,'' असे आश्वासन दिले आहे.
फतेहाबाद येथील भाजपा उमेदवार दुदाराम बिश्नोई यांनी मतदारांना संबोधित करताना मी आमदार झाल्यावर तुमच्या सर्व समस्या संपुष्टात आणेन, असे आश्वासन दिले आहे. ''तुम्ही मला या मतदारसंघामधून आमदार म्हणून निवडून द्या. त्यानंतर तुमच्या नशापाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, वाहनांवर आकारण्याच येणाऱ्या दंडाचा प्रश्न असेल, अशा ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत. त्या सर्व समस्या संपुष्टात येतील,''असे दुदाराम बिश्नोई यांनी म्हटले आहे.
Dudaram Bishnoi, BJP candidate from Fatehabad (Haryana): Aap sab mujhe yahan se vidhayak bana ke bhejoge, nashe ki baat hai, education ki baat hai, motor waale aapko challan kar dein - ye jo chhoti-moti dikkaten hain, jab aapka beta MLA banega apne aap khatam ho jaenge. (09.10) pic.twitter.com/q9jTQcG34O
— ANI (@ANI) October 10, 2019
दूदाराम बिश्नोई हे काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांचे चुतल भाऊ आहेत. त्यांनी हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपाने फतेहाबाद मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. हरयाणामध्ये विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. येथे सत्ताधारी भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. येथे भाजपासमोर काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या पक्षांचे आव्हान आहे.