मला पंतप्रधान बनवा, कारण मला चहा बनवता येतो !

By admin | Published: October 18, 2016 07:09 PM2016-10-18T19:09:14+5:302016-10-18T19:09:14+5:30

उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मला पण चहा बनवता येतो त्यामुळे मलासुद्धा पंतप्रधान बनवा'

Make me the Prime Minister, because I can make tea! | मला पंतप्रधान बनवा, कारण मला चहा बनवता येतो !

मला पंतप्रधान बनवा, कारण मला चहा बनवता येतो !

Next
>ऑनलाइन लोकमत
 
सहारनपूर, दि. 18 - उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मला पण चहा बनवता येतो त्यामुळे मलासुद्धा पंतप्रधान बनवा'अशी बोचरी टीका आझम खान यांनी मोदींचं नाव न घेता केली. 
 
नवभारत टाइम्सने दिलेल्या  वृत्तानुसार,  मंगळवारी सहारनपुरमध्ये आयोजित इ-रिक्षा कार्यक्रमाच्या वितरणप्रसंगी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 'भाई मलापण चहा बनवता येतो इतकंच काय मी ढोलसुद्धा वाजवतो. आतातरी मला देशाचा पंतप्रधान बनवा' असं ते म्हणाले. इतक्यावरच ते थांबले नाहीत, 'मला जर पंतप्रधान बनवलं तर केवळ उत्तरप्रदेश नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 25 लाख रूपये पाठवेल. मी सातत्याने सांगतोय मला पंतप्रधान बनवा, मी देश योग्यप्रकारे चालवू शकतो. माझ्या शिक्षणात किंवा इमानदारीत काहीच अडचण नाही, मी मुसलमान आहे हीच अडचण आहे का? अखंड भारताचं स्वप्न केवळ मी पूर्ण करू शकतो .मुझफ्फरमध्ये दंगे घडवून भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली, संघाच्या मदतीने आणखी कुठेतरी दंगे घडवून उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करण्याचं स्वप्न ते बघत आहे. मात्र, आता जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही' असं ते म्हणाले.  
 

Web Title: Make me the Prime Minister, because I can make tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.