PM Modi: ...तर लॉकडाऊनची गरजच भासणार नाही; मोदींनी तरुणांवर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:23 PM2021-04-20T21:23:30+5:302021-04-20T21:25:49+5:30
make people aware about covid precautions pm narendra modi appeals to youths: देशातल्या तरुणांना आणि लहानग्यांना मोदीचं महत्त्वाचं आवाहन
नवी दिल्ली: लोकांचं आयुष्य वाचवणं आणि त्यांची उपजीविका सुरळीत राहणं याला प्राधान्य द्या. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू द्या, अशा स्पष्ट सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारांना केल्या आहेत. आता आपल्याकडे कोरोनावरील लस उपलब्ध आहे. पण त्यासोबतच प्रतिबंधात्मक सूचनांचंदेखील पालन करा, असं आवाहन पंतप्रधांनी देशवासीयांना केलं. (make people aware about covid precautions pm narendra modi appeals to youths)
लॉकडाऊन टाळायचाच प्रयत्न करा, तो शेवटचा पर्याय असू दे; पंतप्रधानांची राज्य सरकारांना स्पष्ट सूचना
पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना तरुण वर्गाला विशेष आवाहन केलं. या कठिण समयी अनेकांनी पुढाकार घेत सामाजिक कार्य केलं. गरजूंना जेवण, औषधं पुरवली. त्यांच्या राहण्याची सोय केली. त्या सगळ्या व्यक्तींचा, संस्थांचा मी आभारी आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी देशातल्या तरुणांना एक विशेष आवाहन केलं. तरुणांनी पुढाकार घेऊन स्थानिक पातळीवर समित्या स्थापन कराव्या. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक नियम याबद्दल जनजागृती करावी. लोकांना लसीकरणाची माहिती द्यावी. तरुणांनी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास आपल्याला कंटेन्मेंट झोनची, लॉकडाऊनची गरजच भासणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
I urge the States to consider lockdowns only as the last option and focus creating on micro containment zones: PM Narendra Modi pic.twitter.com/B1CnFlNsIj
— ANI (@ANI) April 20, 2021
कामगारांनी स्थलांतर करू नये, शेतकरी अन् कामगारांचं होईल लसीकरण
स्वच्छता अभियानातील लहानग्यांच्या योगदानाचा संदर्भ देत मोदींनी चिमुकल्यांनादेखील महत्त्वाचं आव्हान केलं. आजही अनेकजण गरज नसताना बाहेर पडतात. घरातल्या अशा व्यक्तींना बाहेर जाण्यापासून रोखण्याचं काम चिमुकल्यांनी करावं. हा बालहट्ट देशाच्या कामी येईल. स्वच्छ भारत अभियानात लहानग्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी लहानग्यांनी मोठ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आता पुन्हा एकदा लहानग्यांवर मी आवाहन करतो. त्यांनी विनाकारण, काम नसताना उगाच घराबाहेर पडणाऱ्या कुटुंबीयांनी बाहेर जाऊ देऊ नये. त्यांनी यासाठी हट्ट करावा. त्यांचा हा हट्ट देशासाठी महत्त्वाचा ठरेल, असं मोदी म्हणाले.