विवाहित असल्यास रेशन कार्डमध्ये करा हे आवश्यक बदल, अन्यथा होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:21 PM2022-08-24T14:21:58+5:302022-08-24T14:22:35+5:30
Ration Card: जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबीयांच्या अपडेशनबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली - जर तुम्ही रेशनकार्ड धारक असाल आणि विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डमध्ये कुटुंबीयांच्या अपडेशनबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. रेशनकार्डमध्ये सर्व सदस्यांची नावं असतात. मात्र जर तुमचा विवाह झाला असेल किंवा कुटुंबामध्ये कुठलाही नवा सदस्य आला असेल तर त्याचं नावसुद्धा रेशन कार्डमध्ये जोडून घेतलं पाहिजे. असे न केल्यास तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. आज आपण जाणून घेऊयात रेशन कार्डामध्ये नव्या सदस्यांचं नाव जोडून घेण्याच्या पूर्ण प्रक्रियेविषयी.
असं जोडा कुटुंबातील नव्या सदस्याचं नाव
- तुमचा विवाह झाल्यानंतर सर्वप्रमथ आधारकार्डमध्ये अपडेट करून घ्या.
- त्यासाठी महिला सदस्याच्या आधारकार्डमध्ये पित्याच्या जागी पतीचं नाव लिहिलं पाहिजे.
- जर कुटुंबाय मुल जन्माला आले तर त्याचे नाव जोडण्यासाठी पित्याचं नाव आवश्यक आहे.
- त्यासोबतच पत्ताही बदलावा लागतो.
-आधारकार्ड अपडेट झाल्यानंतर सुधारित आधारकार्डच्या कॉपीसह खाद्य विभागाच्या अधिकाऱ्याला रेशनकार्डमध्ये नाव जोडण्यासाठी अर्ज द्या.
ऑनलाईनही करू शकता अर्ज
-वर सांगितलेल्या आधार कार्डाच्या प्रक्रियेला पूर्ण केल्यानंतर नोंदणी कार्यालयात जाऊन जमा करा.
- तुम्ही घरबसल्याही नव्या सदस्यांचं नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता.
- त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- जर तुमच्या राज्यामध्ये ऑनलाईन सदस्यांची नावं जोडण्याची सोय असेल तर तुम्ही घरबसल्याही हे काम करू शकता.
- अनेक राज्यांनी पोर्टलवर ही सुविधा दिली आहे. तर अनेक राज्यांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकलेली नाही.
मुलांसाठी ही कागदपत्रे आवश्यक
-जर कुठल्याही मुलाचं नाव रेशनकार्डामध्ये जोडायचे असेल तर आधी तुम्हाला त्याचं आधारकार्ड बनवावं लागेल.
- त्यासाठी तुम्हाला मुलाचं जन्म प्रमाणपत्राचीही आवश्यकता असेल.
-त्यानंतर आधार कार्डसोबत तुम्ही मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये नोंद करण्यासाठी अर्ज देऊ शकता.