मनुचा व्हायला हवा ‘मेकओव्हर’!

By admin | Published: May 11, 2017 03:25 AM2017-05-11T03:25:12+5:302017-05-11T03:25:12+5:30

‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून

'MakeOver' to become Manu! | मनुचा व्हायला हवा ‘मेकओव्हर’!

मनुचा व्हायला हवा ‘मेकओव्हर’!

Next

सुरेश भटेवरा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘विनाकारण’ बदनाम केल्या केलेल्या मनुविषयीचे जनतेच्या मनातील भ्रम दूर करून, ‘मनुचा मेकओव्हर’ करण्याचा निर्धार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंग असलेल्या ‘संस्कार भारती’ने केला असून, केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांकरवी संशोधन करून सत्य जगासमोर आणावे, असा त्यांचा आग्रह आहे.
संस्कार भारतीच सहसंघटनमंत्री अमीरचंद या संदर्भात म्हणतात की, ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने टीकेची झोड उठवून मनुला बदनाम करण्याचा एकतर्फी प्रयोग भारतातातील विविध राजकीय पक्षांनी आजवर केला आहे. मनुवर होणारी ही टीका अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे होत आहे. त्यामुळे मनुची उजळ बाजू समोर आणून त्याच्या व्यक्तिमत्वाचे ‘मेकओव्हर’ व्हायला हवे, असे आमचे म्हणणे आहे. मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठीही संशोधन करून सत्य जगासमोर आणणे गरजेचे आहे, असे अमीरचंद म्हणाले.
मनुस्मृतीचा कालखंड आजपासून १८00 ते २४00 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म ८000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल ५ हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे.
मनुच्या इतिहासकालिन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जाता, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालिन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.

Web Title: 'MakeOver' to become Manu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.