मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान
By admin | Published: March 30, 2015 11:18 PM2015-03-30T23:18:20+5:302015-03-30T23:18:20+5:30
स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या
नवी दिल्ली : स्वातंत्र्यसैनिक, हिंदू महासभेचे नेते आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. याचबरोबर देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये हा पारंपरिक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या सोहळ्याला हजर होते. काँग्रेसचा कुठलाही नेता या सोहळ्याला उपस्थित नव्हता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मदनमोहन मालवीय यांच्या कुटुंबियांनी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारला. गत आठवड्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्नने गौरविले होते. गतवर्षी २४ डिसेंबरला वाजपेयी आणि मालवीय यांना भारतरत्न जाहीर झाला होता.