मलेशिया विमान अपघाताचे पुरावे असुरक्षित, चौकशी सुरू

By admin | Published: July 20, 2014 02:50 AM2014-07-20T02:50:23+5:302014-07-20T02:50:23+5:30

रशिया समर्थक बंडखोर मलेशियन विमानाच्या दुर्घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युक्रेनने शनिवारी केला.

Malaysia plane accident proofs unsafe, launch inquiry | मलेशिया विमान अपघाताचे पुरावे असुरक्षित, चौकशी सुरू

मलेशिया विमान अपघाताचे पुरावे असुरक्षित, चौकशी सुरू

Next
क्वालालंपूर/कीव : रशिया समर्थक बंडखोर मलेशियन विमानाच्या दुर्घटनास्थळाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप युक्रेनने शनिवारी केला. दरम्यान, मलेशियाचे चौकशी अधिकारी युक्रेनची राजधानी कीवला पोहोचले असून, विमान कोसळलेल्या ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत.
मलेशियन चौकशी अधिकारी कीवला आले असून, या विमानाला नेमके काय झाले होते, याचा ते खोलात जाऊन शोध घेणार आहेत. रशिया समर्थक बंडखोरांनी क्षेपणास्त्रचा मारा करून हे विमान पाडल्याचा आरोप केला. 298 प्रवाशांचा बळी घेणा:या दुर्घटनेबद्दल संपूर्ण जग शोकसंतप्त आहे. रशियाच्या मदतीने बंडखोर या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे. बंडखोरांनी 38 प्रवाशांचे मृतदेह दोनेत्सक शहरात नेल्याची तक्रार करून युक्रेनने बंडखोर विमानाचे अवशेष रशियाला नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. मलेशियन एअरलाइन्सचे बोईंग 777 हे विमान अॅमस्टरडॅम येथून क्वालालंपूरला येत होते. ते लुहान्सक भागाच्या क्रेसनी लुच आणि दोनेत्सक भागातील शक्तास्र्कच्या मध्ये कोसळले. (वृत्तसंस्था)
 
विमान दुर्घटनेच्या चौकशीत बाधा येऊ नये यासाठी दुर्घटनास्थळाजवळील भाग सुरक्षित क्षेत्र बनविण्यास युक्रेन सरकार व बंडखोर सहमत झाले आहेत. 4क्क् चौरस कि.मी.च्या भागात कोणताही संघर्ष न करण्यास उभय पक्षांनी सहमती दर्शविली.

 

Web Title: Malaysia plane accident proofs unsafe, launch inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.