मालदीवच्या मंत्र्याचं भारत विरोधी वक्तव्य, लोक भडकले; हजारो भारतीयांनी रद्द केला मालदीव टूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 03:51 PM2024-01-07T15:51:47+5:302024-01-07T15:53:28+5:30
देशातील हजारो लोक #BoycottMaldives लिहून आपला विरोध व्यक्त करत आहेत. हे लोक मालदीवच्या नेत्यांनी भारताविरोधात केलल्या वक्तव्यामुळे भडकले आहेत.
भारत-मालदीव संबंध संध्या ताणले गेल्याचे दिसत आहे. यातच आता बायकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले आह. देशातील हजारो लोक #BoycottMaldives लिहून आपला विरोध व्यक्त करत आहेत. हे लोक मालदीवच्या नेत्यांनी भारताविरोधात केलल्या वक्तव्यामुळे भडकले आहेत. यातच भारत सरकारनेही मालदीवच्या मंत्र्याने केलेल्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे.
लोकांनी मालदीवचा टूर केला रद्द -
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच लक्षद्वीपला गेले होते. त्यांच्या या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आणि होत आहेत. एवढेच नाही, तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले आहे. यानंतर भारताच्या लक्षद्वीप आणि मालदीव यांच्या समुद्र आणि समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यासंदर्भात तुलना सुरू झाली आहे. महत्वाचे म्हणजे, पाहता पाहता ही तुलना एवढी वाढली की तिकडे मालदीव सरकारही टेन्शनमध्ये आले. यानंतर गांगारून गेलेल्या मालदीवच्या एक मंत्र्याने भारत विरोधी पोस्ट केली आणि यावरून वाद निर्माण झाला. यासंदर्भात मरियम शिउना यांनीही अपमानास्पद वक्तव्य केले.
मालदीवमध्ये मुइज्जूचे मंत्रीही भारत विरोधी -
मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींचे चीन प्रेम कुणापासूनही लपलेले नाही. यातच मालदीवचे नेते अब्दुल्ला मोहजुम माजिद यांनी सोशल मीडियावर एक एक पोस्ट शेअर केली, यात त्यांनी म्हटले आहे की, 'मालदीवच्या पर्यटनाला लक्ष्य करण्यासाठी मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो. मात्र भारताला आमच्या बीच पर्यटनापासून कडवी टक्कर मिळेल. आमचे केवळ रिसॉर्ट इंफ्रास्ट्रक्चरच यांच्या संपूर्ण इंफ्रास्ट्रक्चरहून अधिक आहे.' या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग करण्यात आले आहे.