मल्ल्यांचा जगभरातील मुक्त संचार रोखला

By admin | Published: April 16, 2016 03:11 AM2016-04-16T03:11:20+5:302016-04-16T03:11:20+5:30

सक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी) शिफारशीवरून किंगफिशर एअर लाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट विदेश मंत्रालयाने शुक्रवारी निलंबित केला आहे.

Mallya prevented free communication worldwide | मल्ल्यांचा जगभरातील मुक्त संचार रोखला

मल्ल्यांचा जगभरातील मुक्त संचार रोखला

Next

- नबीन सिन्हा,  नवी दिल्ली
सक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी) शिफारशीवरून किंगफिशर एअर लाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट विदेश मंत्रालयाने शुक्रवारी निलंबित केला आहे.
लागोपाठ तीन तारखांना मल्ल्या यांनी ईडीसमोर हजेरी लावली नव्हती. या तपास संस्थेने मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास चालविला आहे. मल्ल्या यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ९ हजार कोटी रुपये तर आयडीबीआयकडून ९०० कोटी रुपयांचे वेगळे कर्ज घेतले होते. बँकांच्या कन्सोर्टियमने मल्ल्या यांना ‘कर्जबुडव्या’ घोषित केले असून आयडीबीआय बँकेच्या कर्जप्रकरणी सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंदविला आहे. मल्ल्यांना पासपोर्ट रद्द का करण्यात येऊ नये, असा सवाल करण्यात आला आहे. त्यांनी मुदतीत उत्तर न दिल्यास पासपोर्ट रद्द केला जाईल.

पाच देशांना विनंतीपत्रे
सीबीआय आणि ईडीने पाच देशांना विनंतीपत्रे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उत्तर न दिल्यास रेड कॉर्नर नोटीस पाठविली जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बंगला आणि खासगी जेटचा लिलाव होणार
मल्ल्या यांचा मुंबईतील बंगला आणि खासगी जेट विमानाचा लिलाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप कुणीही बोली लावायला आलेले नाहीत. बंगल्याची राखीव किंमत १५० कोटी रुपये ठेवण्यात आली असून १५ कोटी रुपये जमा करणे बंधनकारक आहे.

Web Title: Mallya prevented free communication worldwide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.