दीदींचा जय हिंदचा नारा; भाजपा-TMC वादानंतर बदलला स्वतःच्या ट्विटर अन् फेसबुकचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:29 PM2019-06-03T13:29:17+5:302019-06-03T13:36:03+5:30
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
कोलकाताः पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान जय श्री रामच्या घोषणा देणाऱ्यांवर भडकणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसी नेत्यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरच्या ट्विटर आणि फेसबुकवरचा (डिस्प्ले प्रोफाइल)डीपी बदलला आहे. टीएमसीच्या बऱ्याच नेत्यांनी आता डीपीतून 'जय हिंद, जय बांग्ला'चा नारा दिला आहे.
डीपीमध्ये जय हिंद जय बांग्लाच्या घोषणेसह अनेक महापुरुषांचा फोटोही पाहायला मिळत आहे. डीपीमध्ये महात्मा गांधी, क्रांतिकारी नेते सुभाषचंद्र बोस, भगत सिंह, मातंगिनी हाजरा, नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर, कवी काजी नजरूल इस्लाम, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय, धार्मिक आणि सामाजिक विचारक स्वामी विवेकानंद आणि भारतीय संविधानाचे जनक बी. आर. आंबेडकर यांचे फोटो लावण्यात आले आहेत.