ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:28 PM2023-01-14T18:28:37+5:302023-01-14T18:29:06+5:30

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे सेन म्हणाले. 

Mamata Banerjee has the potential to become the next Prime Minister of India claims Nobel laureate Amartya Sen | ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

Next

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी हा दावा केला आहे. त्याच वेळी, ते म्हणाले की २०२४ च्या लोकसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बाजूने एकतर्फी होतील असा विचार करणे चूक असेल. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे ते म्हणाले. 

“मला वाटते की प्रादेशिक पक्षांची भूमिका स्पष्टपणे महत्त्वाची आहे. मला वाटतं द्रमुक हा महत्त्वाचा पक्ष आहे, टीएमसी नक्कीच महत्त्वाची आहे आणि समाजवादी पक्षाचाही काही प्रभाव आहे, पण तो वाढवता येईल की नाही हे मला माहीत नाही. भाजपची जागा दुसरा कोणताही पक्ष घेऊ शकत नाही हे नाकारणं चूक ठरेल. त्यांनी स्वतःला अशा पक्षाच्या रुपात समोर आणलंय, ज्याचा देशाच्या इतर भागांपेक्षा हिंदुंकडे अधिक कल आहे,” असे अमर्त्य सेन म्हणाले. पीटीआय भाषाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

“भाजपने भारताची दृष्टीकोन खूप कमी केला आहे. केवळ हिंदू भारत आणि हिंदी भाषिक भारत या विचारसरणीला अतिशय प्रकर्षाने स्वीकारून भारताचे आकलन संकुचित केले आहे. आज भारतात भाजपचा पर्याय मांडला गेला नाही तर ते दु:खाची गोष्ट ठरेल. मला वाटते की इतर राजकीय पक्षांनी खरोखर प्रयत्न केले एक चर्चा सुरू करू शकतात,” असेही त्यांनी नमूद केले. 

ममता बॅनर्जीपंतप्रधान होणा का?
यावेळी ममता बॅनर्जी या पंतप्रधान बनतील का असा सवाल करण्यात आला. “त्यांच्यात असे करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे दुसरीकडे, ममता एकसंघपणे भाजपविरोधातील जनतेतील निराशेची शक्ती खेचू शकतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही,” असे त्यांनी नमूद केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या काँग्रेसच्या क्षमतेवर सेन यांनी शंका उपस्थित केली. काँग्रेस ‘कमकुवत’ झाल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की हा एकमेव पक्ष आहे जो संपूर्ण भारताचा दृष्टिकोन देऊ शकतो. काँग्रेस खूप कमकुवत झाली आहे आणि काँग्रेसवर किती अवलंबून राहू शकते हे मला माहीत नाही. दुसरीकडे, काँग्रेस निश्‍चितपणे अखंड भारताचा दृष्टीकोन देते, जे इतर कोणताही पक्ष देऊ शकत नाही. पण, काँग्रेसच्या अंतर्गतच फूट पडली आहे,” असेही सेन म्हणाले. 

Web Title: Mamata Banerjee has the potential to become the next Prime Minister of India claims Nobel laureate Amartya Sen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.