Mamata Banerjee On BJP: 'पोलिसांनी गोळी चालवली असती, पण...' ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:11 PM2022-09-14T22:11:03+5:302022-09-14T22:12:20+5:30

West Bengal: पश्चिम बंगालमधील ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपने मंगळवारी 'नबन्ना अभियान' सुरू केले, यादरम्यान हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या.

Mamata Banerjee On BJP: 'Police Would Have Fired, But...' Mamata Attacks on BJP | Mamata Banerjee On BJP: 'पोलिसांनी गोळी चालवली असती, पण...' ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

Mamata Banerjee On BJP: 'पोलिसांनी गोळी चालवली असती, पण...' ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल

googlenewsNext

Mamata Banerjee On BJP: पश्चिम बंगालमधील ममता सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात भाजपने मंगळवारी 'नबन्ना अभियान'(Nabanna March) सुरू केले. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या निदर्शनावरून भाजपवर निशाणा साधला असून रॅलीमध्ये गुंड आणल्याचा आरोप केला आहे.

सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "13 सप्टेंबरच्या रॅलीसाठी भाजपने बंगालच्या बाहेरून सशस्त्र गुंड बोलावले होते. हिंसक भाजप आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला असता, पण सरकारने संयम बाळगला." कोलकाता उच्च न्यायालयाने नबन्ना मार्चमध्ये झालेल्या गोंधळाबाबत राज्याच्या गृहसचिवांकडून अहवाल मागवला आहे. अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

नबन्ना प्रचारात गदारोळ 
भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारच्या विरोधात पश्चिम बंगाल सचिवालयाकडे नबन्ना मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. निषेध मोर्चादरम्यान अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

पोलिसांच्या गाडीला आग
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. निदर्शनादरम्यान पोलिसांची गाडी जाळण्यात आली. टीएमसीचा आरोप आहे की भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोर्चादरम्यान हिंसाचाराचा अवलंब केला आणि पोलिसांचे वाहन पेटवून दिले.

Web Title: Mamata Banerjee On BJP: 'Police Would Have Fired, But...' Mamata Attacks on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.