ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 07:46 AM2024-09-18T07:46:02+5:302024-09-18T07:46:48+5:30

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ममता बॅनर्जीच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरुन फटकारले.

Mamata Banerjee reprimanded by the court! Do not bar women doctors from night shift | ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका

ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका

नवी दिल्ली : कोलकातामधील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे सरकार टीकेचे धनी ठरत आहे. या या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे सरकार टीकेचे धनी ठरत आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान पिळले. आरजी कर रुग्णालयातील बलात्कार, हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (१७ सप्टेंबर) सुनावणी झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ममता बॅनर्जीच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरुन फटकारले.

राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार

सरन्यायाधीश म्हणाले, पश्चिम बंगाल सरकारने या अधिसूचनेत बदल करायला हवा. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही महिलांना नाईट ड्यूटी करण्यापासून रोखू शकत नाही. पायलट आणि लष्करात जवान रात्री सुद्धा काम करतात. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सीबीआयने सादर केलेल्या तपास अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सुनावणी दरम्यान, ज्युनिअर डॉक्टरांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, आम्हाला कामावर परतण्यास कोणतीही अडचण नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत यासंदर्भात बैठक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान विकीपीडियाला पीडित महिला डॉक्टरचे नाव आणि फोटो हटवण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, बलात्कार पीडितेची ओळख जाहीर होता कामा नये. या प्रकरणावर पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे.

Web Title: Mamata Banerjee reprimanded by the court! Do not bar women doctors from night shift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.