"... तर मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन", ममता बॅनर्जींनी दिलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:11 AM2020-09-09T11:11:20+5:302020-09-09T11:15:25+5:30
पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर्षी राज्यात दुर्गा पूजा होणार नाही अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं कोणी सिद्ध केलं तर मी लोकांसमोर 100 उठाबशा काढेन असं थेट आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. मंगळवारी पोलिस दिनाच्या निमित्ताने व्हिडीओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे.
"एक राजकीय पक्ष दुर्गा पूजेसंबंधी अफवा पसरवत आहे. यासंबंधी अद्याप आपण कोणतीही बैठक घेतलेली नाही. पश्चिम बंगाल सरकारने यावर्षी दुर्गा पूजा होणार नाही असं जाहीर केल्याचं सिद्ध करुन दाखवा, मी जनतेसमोर 100 उठाबशा काढेन" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. तसेच काही बनावट आयटी पेजेस दुर्गा पूजेसंबंधी चुकीची माहिती पसरवत असल्याचं देखील म्हटलं आहे.
"मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत."https://t.co/rcRBPfuLQ6#RahulGandhi#Congress#NarendraModi#ModiGovernmentpic.twitter.com/R61vaRajwY
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2020
जाणुनबुजून अफवा पसरवण्याचा प्रयत्न
"जाणुनबुजून अफवा पसरवणाऱ्या अशा लोकांना शोधा आणि त्यांना कान पकडून उठाबशा काढायला लावा असं मी पोलिसांना सांगितलं आहे. जातीय सलोखा बिघडवण्यासाठीच हे सर्व केलं जात आहे. ज्यांनी कधीही दुर्गा किंवा हनुमानाची पूजा केलेली नाही ते लोक आता पूजेबद्दल बोलत आहेत" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी मता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या अनलॉक-4 च्या निर्णयावरून निशाणा साधला होता.
"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
केंद्र सरकार अनलॉक-4 चा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं. अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारला लागू करायचे असतात आणि केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेणे आवश्यक अत्यंत आवश्यक आहे. केवळ मार्गदर्शक सूचना जारी करणे पुरेसे असत नाही. केवळ जिल्हा प्रशासनालाच स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे याची माहिती असते. हे सर्व राज्यघटनेच्या संघीय प्रणालीवर आधारित आहे आणि सर्वांनांच यामध्ये सहकार्य करायला हवं असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.
'मोदींच्या 'मैं देश नही बिकने दूँगा' चा अर्थ होता...', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/0bu1XNg4Iu#Congress#NarendraModi#NirmalaSitharamanpic.twitter.com/WERLYR0AHj
— Lokmat (@MiLOKMAT) September 7, 2020
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जीएसटीच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती राज्यांना झालेल्या जीएसटीच्या नुकसानीची भरपाई न देणे हे देशाच्या संघराज्यीय संरचनेला कमजोर करण्यासारखं असल्याचं देखील म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे.
"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका https://t.co/lgUHTbHtJy#KanganaRanaut#RohitPawar#NCPpic.twitter.com/660lonJDO7
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मोठा निर्णय! 'या' राज्यात मोफत होणार कोरोना चाचणी
कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
"मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा", रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका
"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र