विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 10:36 AM2020-01-11T10:36:46+5:302020-01-11T10:49:22+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा सतत विरोध करताना दिसत आहेत. यातच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच उद्या (दि.12) ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर दिसणार आहेत.
कोलकाता पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांच्यासह नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कोलकातामध्ये नरेंद्र मोदी आणि ममत बॅनर्जी यांची बैठक होण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात दाखल झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांची राजभवनामध्ये बैठक होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee to be present at interactive light and sound show to be inaugurated by Prime Minister Narendra Modi at Millenium Park in Kolkata today. (file pics) pic.twitter.com/7tXIVWHoSD
— ANI (@ANI) January 11, 2020
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ विविध विद्यापीठांत होत असलेली हिंसक निदर्शने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 13 जानेवारी रोजी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. मात्र, या आयोजिलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी बहिष्कार घालणार असल्याचे समजते.
Kolkata: Prime Minister Narendra Modi today to unveil Dynamic Architectural Illumination with synchronized light & sound system of Rabindra Setu (Howrah Bridge), as a part of 150th anniversary celebrations of Kolkata Port Trust. pic.twitter.com/wAfjSYsyHl
— ANI (@ANI) January 11, 2020
कामगार संघटनांनी गेल्या बुधवारी आयोजिलेल्या भारत बंददरम्यान पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी रेल, रास्ता रोको आंदोलन झाले. हिंसक घटनाही घडल्या. हे प्रकार बंदला समर्थन देणाऱ्या डावे पक्ष व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केले असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. डावे पक्ष व काँग्रेसने घेतलेली दुतोंडीपणाची भूमिका आम्ही कदापिही सहन करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या आयोजिलेल्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केले.
(सीएएविरोधातील निदर्शकांना काँग्रेसचा पाठिंबा- प्रियंका गांधी)
(विरोधकांच्या बैठकीवर ममता बॅनर्जी घालणार बहिष्कार)
(केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू)