ममता बॅनर्जींकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे
By admin | Published: May 28, 2016 01:23 AM2016-05-28T01:23:44+5:302016-05-28T01:23:44+5:30
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात ४२ सदस्य असून त्यात १८ नवीन चेहरे आहेत.
कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या मंत्रिमंडळात ४२ सदस्य असून त्यात १८ नवीन चेहरे आहेत.
राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी रेड रोडवर आयोजित एका समारंभात ६१ वर्षीय ममता बॅनर्जी यांना पद व गोपनीयतेची
शपथ दिली.
शपथविधी समारंभाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद
प्रमुख लालूप्रसाद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख
अब्दुल्ला आणि द्रमुकच्या कानिमोझी यांच्यासह मोठ्या संख्येत राजकीय नेते उपस्थित होते.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २९४ पैकी २११ जागांवर विजय मिळविला आहे. (वृत्तसंस्था)
क्रिकेटपटू शुक्लांची वर्णी
बॅनर्जी यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या प्रमुख मंत्र्यांमध्ये अमित मित्रा, पार्थ चटर्जी, सुब्रत मुखर्जी, शोभनदेब चट्टोपाध्याय, अबनी जोरदर, फिरहाद हकीम, अरुप रॉय, गौतम देव, पूर्णेंदु बोस, रवींद्रनाथ घोष, ब्रत्य बसू, शांतिराम महतो, आशिष बॅनर्जी आणि अरुप बिस्वास यांचा समावेश आहे. क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला आणि गायक इंद्रनील सेन यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.