ममता बॅनर्जींची जीभ घसरली, राकेश रोशन यांच्यानंतर आता इंदिरा गांधींना पाठवलं चंद्रावर! म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:16 PM2023-08-29T18:16:36+5:302023-08-29T18:18:54+5:30
अवकाशासंदर्भातील ज्ञानावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
अवकाशासंदर्भातील ज्ञानावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. खरे तर, ममता बॅनर्जी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची (AITC) विद्यार्थी शाखा असलेल्या तृणमूल छात्र परिषदेच्या (TMCP) स्थापना दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका सभेला संबोधित करत होत्या.
यावेळी बोलताना ममता म्हणाल्या, ‘जेव्हा इंदिरा गांधी चंद्रावर पोहोचल्या, तेव्हा त्यांनी राकेश (शर्मा) यांना विचारले की, तेथून भारत कसा दिसतो? त्यांनी उत्तर दिले, 'सारे जहां से अच्छा'. गेल्या आठवड्यात चंद्रयान -3 मिशनच्या यशा बद्दल इस्त्रोचे अभिनंदन करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, इंदिरा गांधी यांनी ‘राकेश रोशन’ यांना विचारले होते की, चंद्रावरून पृथ्वी कशी दिसते?
As per Didi "1st Rakesh Roshan reached the Moon, Indira Gandhi asked Rakesh how India looks from the Moon"
— Kishore Thupati (@kishore_thupati) August 29, 2023
Now "When Indira Gandhi reached the Moon, She asked Rakesh how India looks from the Moon"
Didi 🙏🏻🤣🤣🤣🤣🤣#RakeshRoshanpic.twitter.com/TNwI4yuTV1
नेत्यांचे 'चंद्रज्ञान' -
यापूर्वीही चंद्रयान-3 संदर्भात नेत्यांनी चुका केल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चंद्रयान-3 संदर्भात बोलण्यास सांगितले, तेव्हा त्यांना यासंदर्भात माहिती नसल्याचे दिसून आले. याशिवाय ओमप्रकाश राजभर, राजस्थानचे क्रीडामंत्री, अशोक चांदना यांनीही अशाचप्रकारे वक्तव्य केली. याची सोशल मीडियावरही चर्चा झाली.
एका वृत्त वाहीनीसोबत बोलताना ओमप्रकाश राजभर म्हणाले होते, ''जे वैज्ञानिक दिवस-रात्र संशोधन करून नव नवे संशोधन करतात, त्यांचे आम्ही अभिनंद करतो. जे चंद्रयान-3 संदर्भात बोलत आहेत, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. उद्या पृथ्वीवर येण्याची त्याची जी वेळ आहे, आल्यानंतर, संपूर्ण देशाने त्याचे स्वागत करायला हवे.'' या वक्तव्यानंतर, सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.
तसेच, ''आपण यशस्वी झालो आणि सेफ लँडिंग झाले. आपले जे लोक गेले आहेत, त्यांना सॅल्यूट करतो. आपला देश सायंस आणि अवकाशात आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. त्यासाठी सर्व देशवासीयांना शुभेच्छा देतो.'' या वक्तव्यानंतर, लोकांनी सोशल मिडियावर अशोक चांदना यांना ट्रोल करायला सुरुवात केली. कारण चंद्रयात 3 हे मानव रहीत असल्याचे त्यांना माहीत नव्हते.