ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 02:58 AM2019-06-19T02:58:22+5:302019-06-19T02:58:38+5:30
नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते.
नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या, बुधवारी आयोजिलेल्या बैठकीला उपस्थित न राहाण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे.
नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते. उद्या होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला के. चंद्रशेखर राव यांच्याऐवजी त्यांचे पुत्र व तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव हे उपस्थित राहातील. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहाता आपली भूमिका एका पत्राद्वारे स्पष्ट करणार आहेत. नायडू हे आपल्या कुटुंबीयांसमवेत एक आठवड्याच्या विदेश दौºयावर जात असून ते २५ जूनला अमरावतीमध्ये परत येणार आहेत. (वृत्तसंस्था)