ममतांनी घेतली सोनियांची भेट, भाजपाविरोधासाठी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:38 AM2018-03-29T02:38:46+5:302018-03-29T02:38:46+5:30

तृणमूल कॉग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी संध्याकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या

Mamata met Sonia's meeting, together with BJP | ममतांनी घेतली सोनियांची भेट, भाजपाविरोधासाठी एकत्र

ममतांनी घेतली सोनियांची भेट, भाजपाविरोधासाठी एकत्र

Next

नवी दिल्ली : तृणमूल कॉग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी संध्याकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना मदत करावी, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. जो पक्ष जिथे ताकदवान आहे, तिथे सर्वांनी मिळून त्याला मदत करायला हवी, अशी आपली भूमिका असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसाठी त्या प्रयत्न करीत आहेत. त्याला काँग्रेसने साथ द्यावी, असे अपेक्षित होते. या आघाडीत तृणमूल, टीआरएस, टीडीपी, द्रमुक, राजद, बसपा, सपा, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स आदी पक्षांना आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

नाराज नेत्यांशी केली चर्चा
बॅनर्जी यांनी आज भाजपाचे नाराज व ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच अरुण शौरी यांची भेट घेतली. त्या तिघांशी नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांनी काल शरद पवार, संजय राऊ त तसेच राजदच्या नेत्यांशी चर्चा केली होती. त्या बसपा व सपा नेत्यांनाही भेटल्या होत्या.

Web Title: Mamata met Sonia's meeting, together with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.