मोदी सरकारविरोधात ममतांनी दिला "बीजेपी हटाव देश बचाव"चा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:40 PM2018-07-21T15:40:16+5:302018-07-21T15:40:42+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार आणि भाजपाविरोधात लढाईची घोषणा करताना 15 ऑगस्टपासून बीजेपी हटाव देश बचाव अभियान सुरू करण्याचा नारा ममता बॅनर्जी यांनी दिला. ममता यांच्या या रॅलीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार चंदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
We will start 'BJP hatao, desh bachao' campaign on August 15: TMC Chief & West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/FXMbawUqJd
— ANI (@ANI) July 21, 2018
तृणमूल काँग्रेसने शनिवारी बंगालमध्ये शहीद दिवसाचे आयोजन केले होते. यावेळी ममतांनी बीजेपी हटाव देश बचाव अभियानाचा नारा दिला. येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही बीजेपी हटाव देश बचाव अभियानाची सुरुवात करणार आहोत. 2019 साठी हे अभियान हा एक प्रहार असेल ज्यामधून बंगाल देशाला दिशा देईल, असे ममता म्हणाल्या.
देशातील कानाकोपऱ्यातून लिचिंगच्या बातम्या येत आहेत. भाजपावाले लोकांमध्ये तालिबानी तयार करत आहेत. भाजपा आणि आरएसएसमध्ये काही चांगली माणसेही आहेत, त्यांचा मी सन्मान करते. मात्र काही वाईट खेळ खेळणारेही आहेत.
The way lynching is happening every where in the country, they are creating Talibanis among people. In BJP & RSS, there are good people whom I respect but some are playing dirty games: TMC Chief & West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/mlBJh1CRXC
— ANI (@ANI) July 21, 2018