ममता, अखिलेश आणि मायावती एकाच मंचावर येणार - लालूप्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 08:45 PM2017-07-27T20:45:11+5:302017-07-27T20:53:55+5:30
बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात महाआघाडी बनविणार असल्याचा दावा केला आहे.
रांची, दि. 27 - बिहारच्या सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात महाआघाडी बनविणार असल्याचा दावा केला आहे. या महाआघाडीत कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या समावेश असणार आहे.
लालूप्रसाद यादव यांनी रांचीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येतील आणि महाआघाडी होईल. यासाठी 18 पक्ष एकत्र आले आहेत. याचबरोबर लालूप्रसाद यादव म्हणाले की, 27 ऑगस्टमध्ये पाटणामध्ये महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी एकाच मंचावर कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासह अन्य पक्ष एकत्र येणार आहेत.
लालूप्रसाद यादव यांनी यावेळी नितीश कुमार याच्यांवर हल्लाबोल केला. नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वास घात केला असून गरीब, दलित आणि मागास लोकांच्या पाठीवर त्यांनी चाकूने वार केला आहे. तसेच, त्यांनी जनतेला धोका दिला नाही, महा धोका दिल्याचा आरोप सुद्धा यावेळी लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर केला. नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा होत होती, असेही ते म्हणाले.
या दिवसभरातील घडामोडीनंतर लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व आमदारांची संध्याकाळी आपल्या निवासस्थानी बैठक बोलाविली होती.
Patna: Lalu Prasad Yadav with family members at his residence. Party MLAs also present pic.twitter.com/ItmPnGgJHd
— ANI (@ANI_news) July 27, 2017