कुंभपर्वाच्या यशाची महासभेत मीमांसा अभिनंदनाचा ठराव : महापालिकेने घेतले यशाचे श्रेय
By admin | Published: September 20, 2015 12:53 AM2015-09-20T00:53:45+5:302015-09-20T00:53:45+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी पार पडून काही तास उलटत नाही तोच शनिवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत कुंभपर्वाच्या यशाची मीमांसा करत महापौरांनी पालकमंत्र्यांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव केला. कुंभपर्वाच्या यशाचे श्रेय महापालिकेकडे घेत प्रभागांतील कामांचा निधी सिंहस्थासाठी उपलब्ध करून देणार्या नगरसेवकांबद्दल प्राधान्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Next
न शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी पार पडून काही तास उलटत नाही तोच शनिवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत कुंभपर्वाच्या यशाची मीमांसा करत महापौरांनी पालकमंत्र्यांपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव केला. कुंभपर्वाच्या यशाचे श्रेय महापालिकेकडे घेत प्रभागांतील कामांचा निधी सिंहस्थासाठी उपलब्ध करून देणार्या नगरसेवकांबद्दल प्राधान्याने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनसेचे गटनेता अनिल मटाले आणि शिवसेनेचे नगरसेवक व म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष ॲड. शिवाजी सहाणे यांनी कुंभमेळ्याच्या यशस्वितेबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावावर बोलताना महापौर अशोक मुर्तडक यांनी निवेदन केले. महापौर म्हणाले, भारतातील सर्वांत आदर्श कुंभमेळा म्हणून नाशिकच्या कुंभमेळ्याची गणना होईल. कुठलीही दुर्घटना व रोगराईचा प्रादुर्भाव कुंभमेळ्यात झाला नाही, हे महापालिकेचे यश आहे. कुंभमेळ्यानिमित्त तयार केलेले विस्तीर्ण घाट आणि रिंगरोड हे सुद्धा कुंभमेळ्याच्या यशाचे कारण आहे. नवीन जलशुद्धिकरण केंद्रामुळे साधुग्राममध्ये २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य झाले. साधुग्रामच्या उत्कृष्ट नियोजनामुळे साधू-महंतांचेही समाधान झाले. चांगली सार्वजनिक विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन व्यवस्थापन हे सुद्धा यशस्वीतेचे कारण आहे. गोदावरीचे शुद्ध पाणी तसेच सार्वजनिक स्वच्छता याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. सांघिक प्रयत्नांमुळे कुंभ यशस्वी होऊ शकला, असे सांगत महापौरांनी महापालिकेचे प्रशासनासह पोलीस यंत्रणा, महसूल विभाग व नाशिककर नागरिकांच्याही सहभागाबद्दल आभार मानले. दरम्यान, विषयपत्रिकेवरील आयुक्तांच्या प्रस्तावांना चर्चा न करताच मंजुरी देण्यात आली. इन्फोकुंभपर्व संपले, आता काम हवे!कुंभपर्वाच्या यशापयशाचे निष्कर्ष अद्याप हाती आलेले नसताना महासभेत महापालिकेने घाईघाईने यशाचे श्रेय आपल्या पदरात पाडून घेतले. महापालिकेबद्दल गौरवोद्गार निघत असतानाच सेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे व कन्हैया साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कुंभमेळा संपला, आता प्रभागातील कामांकडे लक्ष द्या, असा सल्ला प्रशासनाला दिला. कुंभमेळ्यामुळे आम्ही आजवर नागरिकांची समजूत काढत आलो. इतके दिवस कुंभमेळ्याच्या नावाखाली लपत राहिलो. परंतु, आता नागरिक आम्हाला जाब विचारायला सुरुवात करतील. त्यामुळे आता तरी नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार आहेत काय, असा सवालही त्यांनी केला. साळवे यांनी तर साधुग्राममध्ये लावण्यात आलेले विद्युत पोल आपल्या प्रभागात लावण्याची सूचना केली. यावेळी महापौरांनीही प्रशासनाला यापुढे थातूरमातूर उत्तरे चालणार नसल्याचे सांगत आता लपायला जागा नसल्याचे स्पष्ट केले.