केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 12:29 AM2019-02-04T00:29:10+5:302019-02-04T10:51:44+5:30

कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने ...

केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Next

कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनीकेंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. तर कारवाईस अटकाव झाल्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

LIVE

Get Latest Updates

11:03 AM

देशातील परिस्थिती आणीबाणीपेक्षाही जास्त भयंकर- माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा



 

10:51 AM

प्रकरणाची सुनावणी उद्या घेण्यात येणार- सरन्यायाधीश रंजन गोगोई



 

10:49 AM

आमच्या टीमला अटक करण्यात आली; कोलकाता पोलीस आयुक्तांनी तातडीनं सरेंडर करावं- सॉलिसिटर जनरल तुषार मेहता



 

10:47 AM

राजीव कुमार यांना वारंवार समन्स बजावूनही त्यांनी सहकार्य केलं नाही; सीबीआयची सर्वोच्च न्यायलयाला माहिती

10:47 AM

कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सहकार्य करण्यास सांगा; सीबीआयची सर्वोच्च न्यायालयात याचिका

10:19 AM

नियम 267 अंतर्गत आप खासदार संजय सिंह यांची राज्यसभेत नोटीस; सीबीआयच्या गैरवापराबद्दल चर्चा करण्याची मागणी



 

10:03 AM

कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी घेतली मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची आंदोलनस्थळी भेट

09:59 AM

दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत आज चर्चा करणार; टीडीपीचे खासदार संसदेत सीबीआयच्या कारवाईचा निषेध करणार- चंद्राबाबू नायडू



 

09:38 AM

सीबीआय-पोलीस वादानंतर तृणमूल आक्रमक; पक्षाचे नेते आज ईव्हीएम प्रकरणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार

09:32 AM

घटना वाचवण्यासाठी एकत्र या; तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांचं विरोधी पक्षांना आवाहन



 

09:28 AM

ममता बॅनर्जी यांचं धरणं आंदोलन सुरुच

06:49 AM

मेट्रो चॅनलजवळ तृणमूल समर्थकांची वाढती गर्दी; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन सुरू

03:10 AM

सीबीआय  प्रकरणी पश्चिम बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांनी घेतली राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट

सीबीआय  प्रकरणी पश्चिम बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांनी घेतली राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट

02:36 AM

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांकडून ममता बॅनर्जींना पाठिंबा - दिनेश त्रिवेदी, तृणमूल नेते



 

02:34 AM

चिटफंड घोटाळ्याची धग ममता बॅनर्जींपर्यंत पोहोचल्याने त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे - कैलाश विजयवर्गीय, भाजपा नेते



 

01:39 AM

पक्षातील नेते आणि समर्थकांशी चर्चेनंतर ममता बॅनर्जींचे पुन्हा आंदोलनस्थळी आगमन



 

01:30 AM

आज सकाळी कोलकाता येथील धर्मतल्ला येथेच होणार पश्चिम बंगाल सरकारच्या कॅबिनेटची बैठक

आज सकाळी कोलकाता येथील धर्मतल्ला येथेच होणार पश्चिम बंगाल सरकारच्या कॅबिनेटची बैठक

01:20 AM

सीबीआय प्रकरणानंतर मिदनापूर रेल्वे स्थानकावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको



 

01:19 AM

ममता बॅनर्जी सोमवारी बंगालच्या अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहणार, फोनवरूनच विधानसभेला संबोधित करणार

ममता बॅनर्जी सोमवारी बंगालच्या अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहणार, फोनवरूनच विधानसभेला संबोधित करणार, सूत्रांची माहिती 

01:05 AM

ममता बॅनर्जींच्या आंदोलनाला मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दिला पाठिंबा



 

12:48 AM

सीबीआय प्रकरणावरून तृणमूल कांग्रेसचे कार्यकर्ते संतप्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला



 

12:42 AM

सीबीआयने आपले काम करावे की करू नये - निर्मला सीतारमन



 

12:39 AM

मी ममता बॅनर्जींशी चर्चा केली आहे, या प्रकरणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत - राहुल गांधी



 

12:37 AM

पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे समर्थकांस सीबीआयविरोधात अनिश्चितकालीन धरणे आंदोलन



 

12:36 AM

हुगळी येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले रेल रोको



 

12:34 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सीबीआय प्रकरणी केली ममता बॅनर्जींशी चर्चा



 

12:33 AM

सीबीआयच्या कारवाईविरोधात आसनसोल येथे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर



 

Web Title: केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : सीबीआयच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.